• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

जपानमध्ये चमकणार श्रीगोंद्याची श्रद्धा लोंढे

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी विकसित केले एआय आधारित तंत्रज्ञान

Admin by Admin
October 22, 2026
in Success Story
0
जपानमध्ये चमकणार श्रीगोंद्याची श्रद्धा लोंढे
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे श्रीगोंद्याहून

जिद्द, कल्पकता आणि विज्ञानाची जोड मिळाली की ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकते, हे श्रीगोंदा तालुक्यातील चांदगाव येथील श्रद्धा रमेश लोंढे हिने सिद्ध करून दाखवले आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ आणि स्वावलंबी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित नाविन्यपूर्ण शिक्षक सहाय्यक प्रणाली विकसित करणाऱ्या श्रद्धाने राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर-मानक विज्ञान प्रकल्प स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे आता जपानमध्ये आयोजित वैज्ञानिक अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झाली असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्रद्धा ही चांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तिने त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. तिच्या या प्रयत्नातून ‘एआय-बेस टीचर असिस्टंट फॉर द व्हिज्युअली इंपेअर’ ही अभिनव प्रणाली साकारली. विज्ञान शिक्षक सुभाष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रकल्प विकसित केला.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्वतःहून अभ्यास करता यावा, शैक्षणिक माहिती समजून घेता यावी आणि शिक्षणासाठी इतरांवरील अवलंबित्व कमी व्हावे, हा या उपकरणामागील मुख्य उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाचन सुलभ करणे, आवाजाद्वारे मार्गदर्शन करणे तसेच ब्रेल लिपीसह विविध शैक्षणिक बाबी शिकण्यासाठी मदत करणे, अशी या प्रणालीची संकल्पना आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या १२ व्या राष्ट्रीय इन्स्पायर-मानक विज्ञान प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत श्रद्धाने आपल्या प्रकल्पाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळवत तिने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिला जपानमधील ‘साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत’ अभ्यास दौऱ्याची संधी उपलब्ध झाली आहे. या दौऱ्यातून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येणार आहे.

श्रद्धाच्या या यशामुळे चांदगावसह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे पेटंट दाखल करण्यासाठीही केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची माहिती देण्यात आली आहे. श्रद्धाच्या यशाबद्दल आमदार रोहित पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि सामाजिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

Previous Post

प्लास्टिक कचऱ्याला दाखवली विकासाची नवी वाट!

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.