• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अभिनेता सुर्याने ६,७०० हून अधिक विद्यार्थ्यांचे बदलले आयुष्य!

‘आगरम’ने शिक्षणात घडवला ‘चमत्कार’

Admin by Admin
October 3, 2026
in Inspirational
0
अभिनेता सुर्याने ६,७०० हून अधिक विद्यार्थ्यांचे बदलले आयुष्य!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सूर्या केवळ रुपेरी पडद्यावरील अभिनयामुळेच नव्हे, तर सामाजिक कार्यामुळेही चर्चेत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने सुरू केलेल्या त्याच्या ‘आगरम फाउंडेशन’ने हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले आहे.

२००६ मध्ये स्थापन झालेल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कुटुंबातील पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. आतापर्यंत ६,७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७० हून अधिक डॉक्टर आणि १,७५० पेक्षा जास्त इंजिनिअर्स घडले आहेत. याशिवाय शेकडो विद्यार्थ्यांनी पॅरामेडिकलसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आपल्या कुटुंबातील पहिले पदवीधर आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक अडचणींवर मात करत या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे आगरम फाउंडेशनचा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देणारा ठरला आहे.

सूर्या याने यापूर्वी आपल्या सामाजिक कार्यामागील भूमिका स्पष्ट करताना, हे दान किंवा सामाजिक कार्य नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त केली होती.

दरम्यान, आगरम फाउंडेशनच्या या कामगिरीची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. अभिनेता आर. माधवन यानेही सूर्याच्या या उपक्रमाचे जाहीरपणे कौतुक केले आहे.

Previous Post

भारतीय कॅप्टनने वाचविले १७४ जणांचे प्राण

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.