• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

खाकी वर्दीतील माणूसकीचे… तत्परतेने वाचविले वारकऱ्याचे प्राण

वारीत भेटला विठ्ठल

Admin by Admin
July 9, 2026
in my news pune
1
खाकी वर्दीतील माणूसकीचे… तत्परतेने वाचविले वारकऱ्याचे प्राण

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

पुण्यातील पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी कर्तव्य बजावत असताना एका फिट येऊन कोसळलेल्या वारकऱ्याचे प्राण वाचवले. आयपीएस अधिकारी असण्यासोबतच ते मूळचे डॉक्टर असल्याने, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वारकऱ्याला त्वरित प्रथमोपचार दिले आणि रुग्णालयात पाठवले.

श्रद्धा, समता, सेवा आणि भक्तीचा अलोट सागर असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज पुण्यनगरीत मोठ्या उत्साहात आगमन झाले. दोन्ही पालख्या आज पुणे शहरात मुक्कामी आहेत. मात्र, याच सोहळ्यादरम्यान एका वारकऱ्याचा जीव धोक्यात आला होता, ज्याला पुणे पोलीस दलातील एका संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या समयसुचकतेने आणि डॉक्टरी कसबाने जीवदान दिले.

डॉ. भाजीभाकरे हे मूळचे एमबीबीएस डॉक्टर असून त्यांनी वैद्यकीय व्यवसायाऐवजी महाराष्ट्र पोलीस सेवेत प्रवेश करून लोकसेवेचा मार्ग स्वीकारला. आज ते पुणे शहर वाहतूक शाखेत पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. मात्र, गरज पडली की त्यांच्यातील डॉक्टर आजही तितक्याच तत्परतेने जागा होतो. पालखी सोहळा पुण्यात दाखल होत असताना गर्दीत चालत असलेल्या एका वारकऱ्याला अचानक फीट आली आणि तो तोंडावाटे फेस काढून रस्त्यावर कोसळला. बंदोबस्तावर तैनात असलेले वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे तातडीने धावून आले आणि त्यांनी वैद्यकीय कौशल्य वापरून वारकऱ्याला लगेचच आवश्यक ती प्राथमिक मदत दिली. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे वारकऱ्याची प्रकृती स्थिर झाली आणि त्याचे प्राण वाचले。

वारीच्या सेवेत घडलेली ही घटना केवळ एका वारकऱ्याचे प्राण वाचवण्यापुरती मर्यादित नाही; ती खाकी वर्दीतील संवेदनशीलता, माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. खाकी वर्दीतील या संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत असून, त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Previous Post

तिरुपतीचा कचरा ठरत आहे सोन्याची खाण

Admin

Admin

Comments 1

  1. Sushil Suresh Potdar says:
    45 minutes ago

    छान बातमी

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.