• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

ऐक, एक गोष्ट सांगतो स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ’शब्दसारथी’च्या वतीने यशस्वी आयोजन

Admin by Admin
February 3, 2025
in my news pune
0
ऐक, एक गोष्ट सांगतो स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ’शब्दसारथी’च्या वतीने यशस्वी आयोजन

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

आजच्या आधुनिक काळात लहान मुले मोबाईलच्या आहारी जात असताना गोष्टींचं जग मागे पडत आहे हे लक्षात घेऊन खास लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या विशेष कथाकथन स्पर्धेला लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गणेश जयंतीचे औचित्य साधून ‘शब्दसारथी’च्या वतीने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


ही स्पर्धा आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही माध्यमातून घेण्यात आली. १०० हून अधिक मुले या दोन्ही स्पर्धांत राज्यभरातून सहभागी झालेली होती. सहभागी झालेल्या लहान मुलांनी अनेकानेक उत्तम गोष्टी सांगून उपस्थितांचे रंजन केले. इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतची मुले या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झालेली होती.


या प्रसंगी ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार म्हणाले, पूर्वी आजी-आजोबा मुलांना गोष्टी सांगायचे. आजकाल मोबाईल नावाची गोष्ट मुलांच्या हातात आल्यापासून त्यांचे गोष्टींचे जग मागे पडले आहे ते पुन्हा एकदा त्यांना मिळावे आणि त्यांनी उत्तमोत्तम गोष्टींच्या जगात रमावे म्हणून या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. गोष्ट सांगण्यामागची मुलांची ऊर्मी आणि त्यांचा उत्साह सर्वात मोलाचा आहे.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नव्या पिढीचे आघाडीचे लेखक चिदविलास क्षीरसागर आणि लेखिका हिनाकौसर खान यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रीती पोतदार यांनी केले.

Previous Post

भारतीय रेसिंग विश्वातला नवा चमकता तारा – सार्थक चव्हाण

Next Post

कोरोना काळातही रुग्णांना हात लावून तपासणारा देवदूत – डॉ. दिलीप देवधर..अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण, रुग्णसेवेला वाहिलेले जीवन

Admin

Admin

Next Post
कोरोना काळातही रुग्णांना हात लावून तपासणारा देवदूत – डॉ. दिलीप देवधर..अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण, रुग्णसेवेला वाहिलेले जीवन

कोरोना काळातही रुग्णांना हात लावून तपासणारा देवदूत - डॉ. दिलीप देवधर..अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण, रुग्णसेवेला वाहिलेले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.