• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

कॅन्सरला मात देऊन झाली करोडोंची मालकीण!

Admin by Admin
August 23, 2024
in Inspirational
0
कॅन्सरला मात देऊन झाली करोडोंची मालकीण!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook
  • ‘द स्काय क्वीन’ म्हणून गौरव
  • १० खासगी जेटसह ४०० कोटींची उलाढाल

 

स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)

आजची चांगली बातमी आहे भोपाळहून…

कॅन्सर झाल्यानंतर खचून न जाता त्यावर मात करून कनिका टेकरीवाल यांनी जेटसेटगो ही भारतातील पहिली विमान भाड्याने देणारी कंपनी सुरू केली. वैयक्तिक संघर्षापासून ते देदीप्यमान यशापर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.

कनिका यांचा जन्म १९९० मध्ये एका मारवाडी कुटुंबात झाला होता. त्यांनी लॉरेन्स स्कूल, लव्हडेल व भोपाळमधील जवाहरलाल नेहरू वरिष्ठ माध्यमिक शाळा येथून माध्यमिक शिक्षण घेतले आणि नंतर कॉन्व्हेंट्री विद्यापीठातून पदवी मिळवली. पण, कनिका यांना आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. वयाच्या २० व्या वर्षी झालेल्या कर्करोगाशी झुंज देत लढताना मानसिक ताकदीची कसोटीच लागली. पण कनिका यांनी हार मानली नाही. कनिका यांनी २०१२ मध्ये JetSetGo ची स्थापना केली. या व्यवसायात त्यांना हळूहळू यश मिळत गेले. आता त्यांचा व्यवसाय तब्बल ४२० कोटी रुपयांचा झाला आहे. कनिका यांना उद्योग विश्वात मान आहे. आता वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांच्याकडे १० खासगी जेट आहेत.

कनिका यांचा २० व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देण्यापासून ते हुरुन रिच लिस्टमधील सर्वांत तरुण व श्रीमंत महिला उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कनिका सध्या त्यांच्या व्यावसायिक पतीसह उद्योजकीय जगात प्रगती करीत आहेत. कनिका टेकरीवाल यांनी  कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी दिलेला लढा ही अत्यंत आव्हानात्मक बाब आहे.

हल्ली या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण हा आजार झाल्याचे कळताच खचून जातात; पण काही जण असेही आहेत की, जे या आजारावर मात करून, स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात. कॅन्सर झालेल्या लाखो रुग्णांसाठी प्रेरणादायी असलेल्या कनिका टेकरीवाल यांचा प्रवासही असाच आहे.

Previous Post

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; ढोलताशांचा गजर! ऑलिम्पिकवीर स्वप्निलचे जंगी स्वागत

Next Post

जागर संतांच्या वैचारिक परंपरेचा, वैश्विक एकात्मतेचा!

Admin

Admin

Next Post
जागर संतांच्या वैचारिक परंपरेचा, वैश्विक एकात्मतेचा!

जागर संतांच्या वैचारिक परंपरेचा, वैश्विक एकात्मतेचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.