• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

३६ हजारांहून अधिक घरांना मिळाला थंडाव्याचा दिलासा

भारतीय संस्थेच्या भन्नाट उपायाची जगभरात दखल

Admin by Admin
November 17, 2026
in Success Story
0
३६ हजारांहून अधिक घरांना मिळाला थंडाव्याचा दिलासा
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून

वाढत्या जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब आणि कष्टकरी वर्गाला बसत असताना, अहमदाबादमधील एका भारतीय संस्थेने यावर अत्यंत साधा, स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. घराच्या छताला उष्णता परावर्तित करणारा पांढरा रंग देऊन घरातील तापमान तब्बल पाच अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्याचा अभिनव प्रयोग ‘महिला हाउसिंग ट्रस्ट’ने (MHT) यशस्वी केला आहे. या उल्लेखनीय कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली असून, प्रतिष्ठेच्या ‘द अर्थशॉट पुरस्कार २०२६’च्या अंतिम १५ संस्थांमध्ये या भारतीय संस्थेची निवड झाली आहे.

शिवणकाम, पापड-लोणची निर्मिती, हस्तकला अशा विविध माध्यमांतून अनेक गरीब महिला घरातूनच रोजगार मिळवतात. मात्र, झोपडपट्ट्यांमधील पत्र्याची आणि सिमेंटची घरे उन्हामुळे प्रचंड तापतात. महिला हाउसिंग ट्रस्टच्या अभ्यासानुसार, पुरेशी हवा खेळती नसल्यामुळे अशा घरांमधील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे पाच अंशांनी अधिक असते. परिणामी, उन्हाळ्यातील चार महिन्यांत असंघटित क्षेत्रातील महिलांच्या उत्पन्नात सरासरी २३ टक्क्यांची घट होते. वर्षाला जेमतेम एक लाख रुपये कमावणाऱ्या महिलांसाठी हा मोठा आर्थिक फटका ठरतो.

या समस्येवर उपाय म्हणून ट्रस्टने ‘कूल रूफ्स’ ही संकल्पना राबवली आहे. घराच्या छतावर सूर्यकिरणे परावर्तित करणारा विशेष पांढरा रंग लावण्यात येतो. त्यामुळे छत कमी तापते आणि घरातील तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत कमी ठेवण्यास मदत होते. या उपायामुळे घरात राहणे आणि काम करणे अधिक सुसह्य झाले आहे. अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि इंदूरसह विविध शहरांतील ३६ हजार ५०० हून अधिक घरांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

केवळ घर थंड ठेवण्यापुरतेच ट्रस्टचे काम मर्यादित नाही. अतिउष्णतेमुळे काम बंद ठेवावे लागणाऱ्या महिलांसाठी संस्थेने ‘पॅरामेट्रिक इन्शुरन्स’ ही विशेष विमा योजना सुरू केली आहे. ठरावीक तापमान मर्यादा ओलांडल्यास महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा होते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक महिलांना विमा संरक्षण मिळाले आहे.
या उपक्रमात महिलांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे. त्यांना तापमान मोजणाऱ्या उपकरणांचे प्रशिक्षण दिले जाते. रंग लावलेल्या आणि न लावलेल्या घरांमधील तापमानातील फरक त्या स्वतः नोंदवतात. यामुळे उष्णतेमुळे होणारा त्रास, त्वचेच्या समस्या आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत झाली आहे.

१९९४ पासून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने सुरुवातीला झोपडपट्ट्यांमध्ये पाणी, शौचालये आणि सांडपाणी व्यवस्थेसारख्या मूलभूत सुविधांसाठी काम केले. आज संस्थेचा विस्तार देशातील सुमारे दहा राज्यांमध्ये झाला आहे.
‘फिक्स अवर क्लायमेट’ या श्रेणीत अर्थशॉट पुरस्कारासाठी निवड झालेल्या या संस्थेचा पुरस्कार सोहळा १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराच्या विजेत्यांना प्रत्येकी दहा लाख पौंडांचा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, २०३० पर्यंत आशिया आणि आफ्रिकेतील ३० लाख घरांना कूल रूफ्सचा लाभ देण्याचे तसेच तीन लाख महिलांना उष्णता विम्याचे संरक्षण देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

साध्या पांढऱ्या रंगातून उष्णतेशी लढण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या भारतीय प्रयोगाने पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणालाही नवी दिशा दिली आहे.

Previous Post

महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!

Next Post

३६ हजारांहून अधिक घरांना मिळाला थंडाव्याचा दिलासा

Admin

Admin

Next Post
३६ हजारांहून अधिक घरांना मिळाला थंडाव्याचा दिलासा

३६ हजारांहून अधिक घरांना मिळाला थंडाव्याचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.