• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पुण्याचे 80 ‘कुश-लव’ सादर करणार गीतरामायण!

Admin by Admin
August 20, 2024
in Positive news
1
पुण्याचे 80 ‘कुश-लव’ सादर करणार गीतरामायण!
  • अयोध्येच्या राम मंदिरात होणार कार्यक्रम
  • स्वरतरंग संगीत अकादमीचा पुढाकार

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

 

पुण्यातील ८० बाल कलाकारांचा चमू येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित राम मंदिरामध्ये स्व. ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर करणार आहेत. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीच्या वतीने हा कार्यक्रम होतो आहे.

 

पुण्यातील स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे बाल कलाकारांच्या गटासह व अयोध्या स्थित राममंदिरात होणारा हा गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम असून तो कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातील स्वरतरंग अकादमी व बाल कलाकारांना मिळाला आहे.

 

या कार्यक्रमासाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ कीर्तनकार चारूदत्त आफळे, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे – चापेकर, गायक आनंद माडगुळकर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक महेश काळे, अभिनेता योगेश सोमण, प्रसाद ओक आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील बाल कलाकार स्वर स्वरतरंग संगीत अकादमीच्या माध्यमातून असा अनोखा व अभिनंदनीय कार्यक्रम होतो आहे, ही पुणे व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे शुभेच्छांमध्ये त्यांनी म्हटले आहे. शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे याआधी गीत रामायण, बालमुखातून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयावरील सामुहिक गीत सादरीकरणाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.

 

गीत रामायण गदिमा व बाबुजींकडून आपल्याला मिळालेले अमुल्य असे वरदान आहे. आपली वैभवशाली परंपरा आणि संस्कार पुढच्या पिढीला माहिती व्हावा या उद्देशाने अयोध्येतील राम मंदिरात गीतरामायण सादरीकरणाचे स्वप्न आम्ही पाहिले. सर्वांच्या प्रयत्नाने ते प्रत्यक्षात येते आहे. यासाठी सर्व पुणेकर व असंख्य मराठीजनांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असे मत स्वरतरंग संगीत अकादमीच्या संचालिका  प्राजक्ता जहागीरदार यांनी व्यक्त केले.

 

Previous Post

आजीबाई धावल्या सुसाट, बेफाम…! माहित आहे का कशासाठी? …

Next Post

विद्यार्थीनींनी बांधली पुस्तकांनाच राखी!…

Admin

Admin

Next Post
विद्यार्थीनींनी बांधली पुस्तकांनाच राखी!…

विद्यार्थीनींनी बांधली पुस्तकांनाच राखी!...

Comments 1

  1. Sushil says:
    2 years ago

    Khupach chhan

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.