• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

ओसाड जमिनीवर फुलवले निसर्गाचे नंदनवन!

'पॉन्डमॅन' रामवीर तंवर यांची पर्यावरण संवर्धनाची अनोखी चळवळ

Admin by Admin
November 20, 2026
in Inspirational
0
ओसाड जमिनीवर फुलवले निसर्गाचे नंदनवन!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे नोएडाहून

जिथे कधीकाळी ओसाड जमीन आणि नापीक माती होती, तिथे आज पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. पाणपक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळत असून निसर्गाची जैवविविधताही पुन्हा बहरत आहे. हे चित्र प्रत्यक्षात साकारले आहे ते ‘पॉन्डमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे पर्यावरणप्रेमी रामवीर तंवर यांच्या प्रयत्नांतून!

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील जेवर येथे त्यांनी मिनी जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण होत आहे. जेवर येथील या उद्यानात तीन तलाव तयार करण्यात आले असून, पक्ष्यांना सुरक्षितपणे घरटी बांधता यावीत यासाठी तीन कृत्रिम बेटे उभारण्यात आली आहेत.

याशिवाय सुमारे पाच हजार देशी वृक्ष आणि वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात पाणपक्ष्यांसह विविध जीवांना अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. ओसाड जमिनीचे हिरव्यागार जैवविविधता उद्यानात रूपांतर करण्याचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

रामवीर तंवर हे मूळचे ग्रेटर नोएडा येथील डाढा गावचे रहिवासी आहेत. लहानपणी गावातील तलावांमध्ये पाणी, पक्षी आणि निसर्गाचे सुंदर चित्र त्यांनी अनुभवले होते. मात्र, कालांतराने हेच तलाव कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्यामुळे नष्ट होत असल्याचे त्यांनी पाहिले. ही परिस्थिती बदलण्याचा त्यांनी निर्धार केला.

मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतःला वाहून घेतले. जलस्रोतांचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी ‘जल चौपाल’ ही जनजागृती मोहीम सुरू केली.

तसेच पर्यावरण संवर्धनाचे कार्य व्यापक करण्यासाठी ‘से अर्थ’ (Say Earth) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ‘सेल्फी विथ पॉन्ड’ यांसारख्या उपक्रमांतूनही त्यांनी लोकसहभाग वाढवला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये त्यांनी ८० हून अधिक तलाव आणि पाणथळ जागांच्या पुनरुज्जीवनासाठी योगदान दिले आहे. पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी तलावांमध्ये १०० हून अधिक छोटी बेटेही तयार केली आहेत.

रामवीर यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली होती. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव विविध स्तरांवर करण्यात आला आहे. नोकरी, पैसा आणि वैयक्तिक प्रगतीच्या पलीकडे जाऊन निसर्गासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या रामवीर तंवर यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

तलाव वाचवले तर पाणी वाचेल, पक्षी वाचतील आणि पर्यावरणाचा समतोलही टिकून राहील, हा संदेश त्यांच्या कार्यातून समाजापर्यंत पोहोचत आहे.

Previous Post

शाळांनो, सावधान! प्रवेशासाठी डोनेशन मागाल तर कारवाई अटळ!

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.