• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

झाडांच्या पुनर्रोपणासाठी धारिवाल फाउंडेशनचा पुढाकार

Admin by Admin
August 27, 2025
in my news pune
0
झाडांच्या पुनर्रोपणासाठी धारिवाल फाउंडेशनचा पुढाकार

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
सुमारे १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, त्याच्या पुनर्रोपणासाठी नागरिकांनी मदत करावी,’ असे आवाहन आर. एम. धारिवाल फाउंडेशनतर्पेâ करण्यात आले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी हे आवाहन केले आहे.
‘पुणे रिंग रोड’मुळे धोक्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष पुनर्रोपण’ मोहीम राबवण्यात येत आहे. त्याच अंतर्गत सुमारे १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग-रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता असून, पुनर्रोपणासाठी नागरिकांनी मदत करावी,’ असे आवाहन करण्यात आले.
‘आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मदतीने वृक्ष पुनर्रोपण मोहीम राबविण्यात येत आहे. संस्थेने आतापर्यंत पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रस्ता परिसरातील सुमारे दोन२ हजार परिपक्व झाडांचे पुनर्रोपण केले आहे,’
याबाबत जान्हवी धारिवाल म्हणाल्या, ‘आपल्या देशात दररोज रस्ते, बांधकामे आणि इतर विकासकामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. विकास आवश्यक असला, तरी परिपक्व वृक्ष तोडण्याने पर्यावरणाची मोठी हानी होते. मात्र, वृक्ष पुनर्रोपणामुळे झाडांना नवे जीवन मिळू शकते. ‘एक परिपक्व झाड दररोज साधारण चार माणसांसाठी पुरेसा ‘ऑक्सिजन’ निर्माण करते आणि दरवर्षी दहा ते चाळीस किलोपर्यंत ‘कार्बन डायऑक्साइड’ शोषून घेत असते. त्यामुळे झाडांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. विकास प्रकल्पामुळे अनेक प्रकारची परिपक्व झाडे तोडली जातात. आता त्यांना जगवण्यासाठी पुनर्रोपणाचा पर्याय उपलब्ध आहे. या झाडाचे काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास सुमारे ऐंशी टक्के झाडे जगू शकतात.’
विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे नेण्यासाठी वृक्ष पुनर्रोपण अभियानात सहभागी व्हा. साथ द्या. या चळवळीबद्दल जागरूकता निर्माण करा. अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. समविचारी नागरिकांना जोडा. एकत्र येऊन झाडे वाचवू आणि आपले उद्याचे भविष्य सुरक्षित करू, असेही
त्या म्हणाल्या.
अशा प्रकारे मदत करा
झाडांचे शेत जमीन, लष्कराची जमीन किंवा जंगल अशा सुरक्षित ठिकाणी पुनर्रोपण करण्यासाठी आर्थिक मदत, झाडांच्या देखभाल घेण्यासाठी २ वर्षांसाठी ‘एक झाड दत्तक घ्या’ आणि पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन जान्हवी धारिवाल यांनी केले.

Previous Post

वंशी मुदलियारचा सुवर्ण स्वर

Next Post

तृतीयपंथीयांचा ‘मनस्वी’ प्रवास

Admin

Admin

Next Post
तृतीयपंथीयांचा ‘मनस्वी’ प्रवास

तृतीयपंथीयांचा 'मनस्वी' प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.