स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी मुंबईहून
मुंबईस्थित रीडलॅन एआय फाउंडेशनने रस्त्यांवर राहणाऱ्या गायींच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत गौ रक्षा कवच तयार केले आहे. गौ रक्षा कवचामुळे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ च्या मदतीने गायींची काळजी घेण्यात व त्यांना सुरक्षित ठेवण्यात मदत होणार आहे. हे वेळेवर अलर्ट आणि रिमाईंडर पाठवते, ज्यामुळे गायींचे लसीकरण आणि अंतर्गत परजीवी काढण्याची प्रक्रिया वेळेवर होऊन जीवघेण्या आजारांपासून त्यांचा बचाव होण्यास मदत होते .
गौ रक्षा कवचाची वैशिष्ट्ये
एआय सक्षम असलेले हे टॅग गायींची काळजी घेणाऱ्याला सूचना पाठवतात, जेणेकरून लसीकरण आणि उपचार वेळेवर होऊन आजारांचा प्रसार रोखता येतो. रिफ्लेक्टिव्ह कॉलर हे विशेष कॉलर रात्रीच्या वेळी गायींना दृश्यमान करतात, ज्यामुळे रस्ते अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. गायींचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात संग्रहित केला जातो, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सहज आणि प्रभावीपणे ट्रॅक करता येते.
याविषयी फाउंडेशनचे संस्थापक अक्षय रिडलन म्हणाले, “आम्ही एक सेंट्रलाईज डाटाबेस तयार करत आहोत, जो गायींमध्ये होणाऱ्या विविध आजारांवर लक्ष ठेवेल. तसेच, आम्ही असे एआय मॉडेल विकसित करत आहोत, जे स्तनसंक्रमण, लंगडणे आणि पचन समस्या यासारख्या आजारांची पूर्वसूचना देऊ शकेल, जेणेकरून वेळेत उपचार होऊ शकतील.”