• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

सोलापूरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात लक्षवेधी मिरवणूका

Admin by Admin
September 8, 2025
in Inspirational
1
सोलापूरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात लक्षवेधी मिरवणूका

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे सोलापुरहून
सध्या नागरिकांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गणेशमूर्तीपासून ते सजावटही पर्यावरणपूरक करण्यावरच अनेकांनी भर दिला. त्याचप्रमाणे डीजेलाही अनेक ठिकाणी नागरिकांनी विरोध करत प्रशासनाला डीजेबंदीचे निवेदन दिले. पोलिस प्रशासनानेही अनेक गणेश मंडळांच्या बैठक घेऊन डीजेमुक्त गणेशत्सोवाचे आवाहन केले, तसेच वेळप्रसंगी कारवाई करण्याचा इशाराही दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी यंदा डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा केला. सोलापूरात यंदा पारंपरिक सवाद्यांच्या गजरात आणि लेझीमच्या तालात गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात पार पडली.
सोलापुरात मात्र यंदा एक वेगळे वातावरण पहायला मिळाले. सोलापुरात यंदा डीजेमुक्त पारंपरिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक पहायला मिळाली. सोलापुरात डीजेवर बंदी घालण्यात आल्याच्या आदेशाचे सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, यंदा सोलापुरात पारंपरिक वाद्यांचा नाद शहरभर घुमला. डीजेमुक्त विसर्जन हे सोलापूरकरवासीयांचे आंदोलनही यशस्वी झाल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत टाळ – मृदुंग, ढोल-ताशा, तुतारी अशा पारंपरिक वाद्यांचा आवाज सोलापूरात घुमला. त्याचबरोबर दांडपट्टा, मल्लखांब, झांज, टपरी, लेझीमची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.
मानाच्या गणपतींचे विसर्जनही वेळेत करण्यात सोलापूरकरांनी बाजी मारली. सोलापूरचा मानाचा पहिला आजोबा गणपती याचे विसर्जन सकाळी ७ ला करत नवा आदर्श प्रस्थापित केला. आता तरी यातून महाराष्ट्रातील इतर भाग तसेच सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे आणि चोखंदळ पुणेकर यातून काही धडा घेतील का हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.
अनेक ठिकाणी प्रशासनाने मंडळांच्या बैठका बोलावत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याकडे अनेक मंडळांनी दुर्लक्ष करत डीजेचा दणदणाट केला. कर्णकर्कश आवाजाने सर्वसामान्य हवालदिल झाले. पुण्यामध्ये तर ३० ते ३५ तास चाललेल्या मिरवणुकीमुळेही सामान्य नागरिक पुरते हैराण झाले. पुण्यात अनेक ठिकाणी ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाले असून आवाजाची पातळी अनेक ठिकाणी १०९ डेसीबल असल्याचे पहायला मिळाले. तर, याउलट सोलापूरात दिलासादायक चित्र पाहायला मिळाले.
डीजेमुक्त विसर्जन मिरवणुक काढल्याबद्दल सामान्य नागरिकांनी सोलापुरातील सर्व गणेश मंडळाचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.

Previous Post

एक अविश्‍वसनीय सत्यकथा

Next Post

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला फायटर ड्रोन

Admin

Admin

Next Post
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला फायटर ड्रोन

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला फायटर ड्रोन

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    6 months ago

    👍🚩

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.