सिद्धार्थ मंडलाच्या इनोव्हेशनची जगभरात चर्चा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची बातमी आहे हैदराबादहून
हैदराबादमधील सिद्धार्थ मंडला फक्त १५ वर्षांचा होता, जेव्हा त्याने महिलांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदा विचार केला. निर्भया प्रकरणाने प्रेरित होत त्याने समस्त महिलांसाठी असे शूज बनविले आहे जे स्वतःचं रक्षण करण्यासाठी उपयोगी पडतात. त्याने ‘इलेक्ट्रोशू’ हे डिव्हाईस बनवले आहे की, संकटात असलेली महिला स्वत:चे रक्षण करू शकेल. ज्यावेळी एखाद्या महिलेवर बिकट प्रसंग आला तर, समोरील व्यक्तीला सुमारे ०.१ अँपिअरचा विजेचा झटका बसतो आणि त्याचवेळी अलर्ट मेसेज पोलीस व कुटुंबियांना पाठवला जातो. म्हणजेच एका बटनाने हल्लेखोर थांबतो आणि मदतही पोहोचते.
लाखो तरुणींच्या मनात असुरक्षिततेचा विचार पसरविणार्या निर्भया प्रकरणाने सिध्दार्थच्या कल्पकतेला चालना दिली आणि असे शूज बनविण्यात तो यशस्वी ठरला. या शूजचं वैशिष्ट्य म्हणजे ते चालताना स्वतःच ऊर्जा निर्माण करतात. पायरी पायरी चालताना त्या उर्जेचा साठा होतो आणि गरज पडल्यास तो विजेचा झटका देऊ शकतो.
२००० साली एका व्यवसायिक वकील आई-वडिलांच्या घरात जन्मलेल्या सिद्धार्थला लहानपणापासून गोष्टी तयार करायला आवडायचं. मात्र निर्भया प्रकरणानंतर त्याच्या कल्पनाशक्तीने सामाजिक दिशेने वळण घेतलं. त्यांनी स्वतः प्रोग्रामिंग आणि कोडिंग शिकण्यासाठी सोशल मीडिया आणि लिंक्डइनवरून मार्गदर्शन घेतलं. प्रोटोटाइप १७ वेळा फसला, आणि त्याला दोनदा विजेचा धक्का बसला. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्याने या तंत्रज्ञानावर जवळपास दोन वर्षं काम केलं. अनेकदा प्रयोग अपयशी ठरले पण त्याने पूर्ण ताकतीने पुन्हा प्रयत्न केले. शेवटी इलेक्ट्रोशू तयार झालं आणि देशभरात त्याचं कौतुक झालं.
सिद्धार्थने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर महिलांसाठी करण्याचं करत सामाजिक क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. आज तो बर्याच सामाजिक कामात सक्रिय झाला असून त्याने ‘कॉकनिझन्स वेलफेअर ईनिशीएटीव्ह’ नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. या माध्यमातून तो लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करतो, मुलींना कोडिंग शिकवत शिक्षणासोबत समाजिक बदलाची चळवळ उभी करतो.
याविषयी सिद्धार्थ मंडला म्हणतो, निर्भया प्रकरणानंतर मी नेटवर शोध घेतला, शिक्षक व मित्रांकडून विचारून बलात्कार या संकल्पनेचा अर्थ समजून घेतला. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मी ठरवलं की मी माझ्या क्षमतेनुसार स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी काही तरी करणार.’यातूनच ‘इलेक्ट्रोशू’ या उपकरणाचा जन्म झाला. हे एक छोटंसं डिव्हाइस आहे जे कोणत्याही बूटावर, अंगठीमध्ये किंवा लॉकेटमध्ये बसवता येते आणि संकटाच्या वेळी सहज सक्रिय करता येते. यात दोन धारदार पॉइंटर असतात जे स्टन गनसारखं काम करतात – हे कपडे किंवा त्वचेतूनही प्रवास करून हल्लेखोराला विद्युत झटका देतात. यात सोलर पॅनलही आहे, जे सूर्यप्रकाशात आपोआप चार्ज होतं.