• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

शर्विका म्हात्रेने अवघ्या 7 व्या वर्षी सर केले 121 किल्ले

Admin by Admin
February 19, 2025
in Inspirational
0
शर्विका म्हात्रेने अवघ्या 7 व्या वर्षी सर केले 121 किल्ले

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

सात वर्षांच्या शर्विका म्हात्रे या चिमुकलीने आतापर्यंत सह्याद्रीच्या कुशीतल्या 121 किल्ल्यांवर झेंडा रोवला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जरी ती एकाच किल्ल्यावर परत गेली तरी तो किल्ला ती एकदाच मोजते.

शर्विका म्हात्रे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर सर करणारी सर्वांत लहान गिर्यारोहक आहे.

शर्विकाने  वयाच्या अवघ्या अडीचव्या वर्षी पहिला किल्ला सर केला. महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पनवेल-कर्जतजवळील ‘कलावंतीण सुळका’ सर करणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे. या व्यतिरिक्त वयाच्या तिसऱ्या वर्षी तिने सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच असा नाशिक जिल्ह्यातील ‘साल्हेर किल्ला’ सर केला. वयाची साडेतीन वर्षं देखील पूर्ण होत नाहीत, त्याआधी शर्विकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ‘कळसूबाई’देखील सर केलं. गुजरातमधील सर्वात उंच ‘गिरनार शिखर’ तिने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सर केलं.

वयाच्या सातव्या वर्षापर्यंत तिने राजगड, रायगड, तोरणा, सिंहगड, साल्हेर, श्रीमलंग गड, भैरवगड, लिंगाणा, तैल बैला, पारगड, माहुली, हरिहर, धर्मवीर गड, भुदरगड, हरिश्चंद्रगड, वैराट गड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, रोहिडा, पुरंदर, कैलासगड असे महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग म्हणजे तब्बल 121 किल्ले यशस्वीपणे सर केले.

अडीच वर्षांची असताना केली ट्रेकिंगला सुरुवात

अडीच वर्षांची असताना शर्विकाने सर्वांत आधी रायगड सर केला. पहिल्यांदा रायगड किल्ला सर केल्यानंतर गडकिल्ल्यावरील तिचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेलं.

शर्विकाचे आई-वडील गिर्यारोहक आहेत. दोघांनाही ट्रेकिंगची आवड आहे. कदाचित, त्यामुळेच शर्विकालाही गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली, असे तिची आई अमृता म्हात्रे सांगतात.

लहानपणापासूनच मोबाईल आणि टीव्हीपासून लांब

शर्विकाला कधीच टीव्ही-मोबाईलचा छंद नव्हता. तिच्या आई-वडिलांनी तिला या सगळ्यापासून लांब ठेवलं. शारीरिक व्यायाम आणि मैदानावरील खेळांमध्येच तिला जास्त मज्जा येते.

शर्विका ट्रेकिंगसोबतच सध्या रॉक क्लाईंबिंगमध्ये तिचं करियर बनवू पाहतेय. किल्ले सर करणं आता तिचा छंद झाला आहे. यातून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना आनंद मिळतोय. तिला इतिहासाची आवड निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले सर करताना तिला इतिहास जवळून पाहायला मिळतोय. तिने प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याची माती गोळा केली आहे.  या मातीत मावळ्यांचे परिश्रम आहेत, असा तिचा विश्वास आहे. तिने ही माती गोळा करून एका पितळाच्या गडव्यात साठवली आहे आणि त्यावर त्या-त्या किल्ल्याचं नाव लिहिलं आहे.

रॉक क्लाईंबिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा मनोदय

हे सगळं करत असतानाच शर्विकाच्या वडिलांनी तिला रॉक क्लाईंबिंगचे धडे देण्याचं ठरवलं. त्यासाठी म्हात्रे कुटुंबीय खास अलीबागहून पुण्यात स्थायिक झाले. शर्विकाला रॉक क्लाईंबिंगमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. शर्विकाला ट्रेकिंगची आवड आहे. त्यामुळे त्याच्याशीच निगडीत एखादा खेळ निवडावा असं त्यांना वाटलं आणि त्यांनी शर्विकाला रॉक क्लाईंबिंगकडे वळवलं.

याविषयी शर्विकाचे प्रशिक्षक अमोल जोगदंड म्हणतात, “शर्विका इतिहास रचणारच.” जेव्हा शर्विकाला पहिल्यांदा क्लाईंबिंग करताना पाहिलं, तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता. एवढीशी मुलगी इतकं चांगलं क्लाईंबिंग कसं करू शकते, याचं त्यांना आश्चर्य वाटलं. मात्र, तिचा सराव घेताना कळलं की, तिच्यात क्षमता आहेत आणि ती जागतिक स्तरावर आपलं नाव मोठं करू शकते.

‘शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन व्हावं‘

शर्विकाला गड-किल्ले सर करण्याची आवड आहेच; मात्र, महाराष्ट्राला लाभलेला हा ठेवा आहे तसाच रहावा आणि त्याचं संवर्धन व्हावं. पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून पाहता, अनुभवता यावा यासाठी ती लहान लहान पावलंही टाकतेय.

गड किल्ल्यांवरील साफसफाई मोहिमांमध्ये ती सहभागी होते. यासोबतच प्रत्येक ट्रेकदरम्यान दिसत असलेला कचरा, प्लास्टिकच्या बॉटल्स, वेफर्सची पाकिटं ती गोळा करत ट्रेक करते. ट्रेक करून झाला, की गोळा केलेला कचरा कचराकुंडीत टाकते.

तिने सरकारलाही आवाहन केलं आहे. ती म्हणते, “मी सरकारला आवाहन करते की, जे लोक गड किल्ल्यावर येऊन दगडांवर, तेथील पवित्र वास्तूंवर स्वत:ची नावं कोरतात, प्लॅस्टिक टाकतात अशांसाठी नियम कडक करण्यात यावेत.”

आजपर्यंत शर्विकाने अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. एवढंच नाही तर तिची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही नोंद झाली आहे.

Previous Post

परदेशात प्रशिक्षण घेऊन घरातच केली ‘केशर’ शेती!

Next Post

सलग दुसऱ्यांदा ठरला तो विश्वविजेता….

Admin

Admin

Next Post
सलग दुसऱ्यांदा ठरला तो विश्वविजेता….

सलग दुसऱ्यांदा ठरला तो विश्वविजेता....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.