• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

चिमूकल्यांचे पर्यावरणपूरक‘ स्टार्ट अप’ चर्चेत

Admin by Admin
November 5, 2025
in Inspirational
1
चिमूकल्यांचे पर्यावरणपूरक‘ स्टार्ट अप’ चर्चेत

उद्योजक कुशलतेचे नेटकर्‍यांसह उद्योजकांकडून कौतुक
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे बंगळुरूहून
बेंगळुरूच्या बसवेश्वरनगरमधून तीन शाळकरी मुलांनी मिळून सुरू केलेले ‘इको वाला’ हे पर्यावरणपूरक स्टार्ट अप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. आज या चिमुरड्या उद्योजकांचे कौतुक नेटकर्‍यांसह मोठे उद्योजक हर्ष गोयंका यांनी देखील केले आहे. या चिमुरड्यांची उद्योजक कुशलता हा चर्चेचा विषय ठरली आहे.
साधारण ६ ते १० या वयोगटातील संस्थापक शारदा, व्यवस्थापक नचिकेता आणि सहायक व्यवस्थापक समुध्याता या तीन मुलांनी पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं आणि सोपं निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. या तिघांनी आपल्या शाळेच्या प्रोजेक्टला एक खर्‍या अर्थाने व्यवसायात रूपांतरित केलं आहे. यातूनच ‘इको वाला’ या कंपनीचा जन्म झाला. या कंपनीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ग्लू किंवा टेप न वापरता तयार केलेल्या मजबूत पेपर बॅग्स. या बॅग्स ते तिघेही घरपोच देतात तेही फक्त १० रुपयांत. त्यांच्या पेपर बॅग्स पूर्णपणे हाताने तयार केल्या आहेत. कोणत्याही चिकट पदार्थाशिवाय फक्त फोल्डिंगच्या अचूक तंत्रामुळे या बॅग्स मजबूत, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या झाल्या आहेत.
केवळ प्लास्टिक वापर कमी करणे एवढंच त्या व्हिडीओचे उद्दिष्ट नाही, तर लोकांना रिसायकलिंगची सवय लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करणे हेही त्यामागचं मोठं उद्दिष्ट आहे.
‘इको वाला’ आता पार्टी किंवा इव्हेंटसाठीही अतिरिक्त बॅग्स पुरवतो, ज्यासाठी ग्राहक स्वतंत्र ऑर्डर देऊ शकतात. या निर्णयामुळे या चिमुरड्यांची उद्योजक कुशलता लक्षात येते.
मुलांच्या या स्टार्टअपविषयी उद्योजक हर्ष गोयंका यांनी देखील प्रतिक्रिया देत ‘शार्क टँक आणि आयडियाबाजला विसरा’ या स्पीचने माझं मन जिंकून घेतलं!’ असे कौतुकाने म्हणाले.
या व्हिडीओचे होतेय कौतुक
आमचं सबस्क्रिप्शन फक्त दहा रुपयांचं आहे. ‘प्रत्येक रविवारी आम्ही तुमच्या घरी दोन पेपर बॅग देऊ — फक्त तुमचा पत्ता द्या,’ असं एका छोट्या उद्योजकाने व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितलं आणि क्षणार्धात हा व्हिडिओ संपूर्ण देशभर पसरत कौतुकाचा विषय ठरला.

Previous Post

‘बस्तर से बाजार तक’ ने झाले आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

Next Post

शाळांना वाचविण्यासाठी सिद्धेश लोकरे निघाला स्कुटीवर

Admin

Admin

Next Post
शाळांना वाचविण्यासाठी सिद्धेश लोकरे निघाला स्कुटीवर

शाळांना वाचविण्यासाठी सिद्धेश लोकरे निघाला स्कुटीवर

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    4 months ago

    वाह
    सकारात्मक 🌱

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.