• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पुण्याच्या आयटीहबला येणार सुगीचे दिवस… मायक्रोसाॅफ्टची मोठी गुंतवणूक

Admin by Admin
September 13, 2024
in my news pune
0
पुण्याच्या आयटीहबला येणार सुगीचे दिवस… मायक्रोसाॅफ्टची मोठी गुंतवणूक

पुण्यात घेतली 520 कोटींत 16 एकर जमीन

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः

आजची चांगली बातमी आहे आयटी हब असणाऱ्या पुण्यातून…

पुणे शहर देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाचे शहर झाले आहे. आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या या शहरात अनेक माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. आता या शहराला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत कारण जागतिक स्तरावरील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने पुन्हा पुणे शहरात जमीन घेतली आहे आणि विस्ताराची योजना आखली आहे.

मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजेवाडीत 16.4 एकर जमीन घेतली आहे. ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीने मायक्रोसॉफ्टला 520 कोटींत विकली आहे. गेल्या तीन वर्षांत मायक्रोसॉफ्टने एकूण 848 कोटींची जमीन खरेदी केली आहे. यापूर्वी 2022 मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये 328 कोटींत 25 एकर जमीन घेतली होती.

पुण्यातील दुसरा मोठा करार
मायक्रोसॉफ्ट इंडियाचा पुण्यातील हा दुसरा मोठा जमीन करार आहे. यापूर्वी कंपनीने येथे 25 एकरचा भूखंड 328 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यावेळी मायक्रोसॉफ्टने फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ही जमीन घेतली होती. आता मायक्रोसॉफ्ट हिंजेवाडीत घेतलेल्या जमिनीवर कंपनी कसला प्रकल्प उभारणार आहे? त्यांची माहिती मायक्रोसॉफ्टकडून अद्याप दिली गेली नाही. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी परिसरातच आहे. पुण्याचे आयटी सर्व्हिसेस हब आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणून हा भाग मानला जातो.

वीस लाख लोकांना एआय शिकवणार
पुण्यात घेतलेल्या जमिनीचा व्यवहार ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यासाठी 31.18 कोटी रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. 6 सप्टेंबर रोजी ही नोंदणी झाली आहे. 2024 च्या सुरुवातीला, मायक्रोसॉफ्टचे भारतातील प्रमुख कौशल पहल म्हणाले होते की, त्यांचा उद्देश 2025 पर्यंत वीस लाख लोकांना आर्टिफिशल इंटेलिजेन्स आणि डिजिटल कौशल्ये शिकवण्याचे आहे. त्यामुळे कंपनीची भारतातील रणनीती तेव्हाच स्पष्ट झाली.

डेटा सेंटर उभारणार
मायक्रोसॉफ्टने या वर्षांच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये 267 कोटीत 48 एकर जमीन घेतली होती. कंपनी त्या ठिकाणी आपला डेटा सेंटर उभारणार आहे. गूगल आणि अ‍ॅमेजॉनसोबत मायक्रोसॉफ्ट डेटा ‘हायपरस्केलर’ आणि डेटा लोकलाइजेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. ऑपरेशनल आणि डेटा केंद्रांव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्टकडे हैदराबाद, बंगळुरू आणि नोएडामधील केंद्रांमध्ये सुमारे 23,000 कर्मचारी कार्यरत आहेत.

Previous Post

पुण्यातील विद्यार्थ्यांनी गणरायासमोर केला वाचनाचा संकल्प

Next Post

असाही एक भारतीय जिगरबाज! १०१ व्या वर्षी जिंकली तीन सुवर्णपदके…

Admin

Admin

Next Post
असाही एक भारतीय जिगरबाज! १०१ व्या वर्षी जिंकली तीन सुवर्णपदके…

असाही एक भारतीय जिगरबाज! १०१ व्या वर्षी जिंकली तीन सुवर्णपदके...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.