स्वदेश न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे थेट पॅरिसहून…
जिंकणे आणि हरणे हा खेळाचा एक भागच आहे, परंतु खेळ आपल्याला मैदानात आपले 100% द्यायला शिकवतात. त्याच बरोबर हिम्मत न हरता, मैदान न सोडता कसं झुंजत राहायचं हेही शिकवतात. नुकत्याच झालेल्या पॅरीस आॅलंपिक स्पर्धेत ज्यांना यश मिळाले, पदके मिळाली त्यांच्या कहाण्या सगळीकडे व्हायरल झाल्या पण ज्यांना पदक मिळाले नाही पण जिद्दीने झुंज दिली त्यांच्या कहाण्या मात्र पडद्यामागेच राहिल्या. अशीच एक झुंजार जिद्दीची ही कहाणी.
देशाची कन्या निशा दहिया. 68 किलो वजनी गटात कुस्ती तिने कुस्ती लढली आणि नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ती पदकाची प्रबळ दावेदार होती. पॅरिस 2024 ऑलिम्पिक मध्ये 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या तिच्या पहिल्याच सामन्यात तिने युक्रेनियन कुस्तीपटूशी चमकदार लढत दिली आणि तिचा पराभव केला. महिला फ्रीस्टाइल 68 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत निशाचा सामना उत्तर कोरियाची कुस्तीपटू पाक सोल गम हिच्याशी होता. या सामन्यात एकेकाळी निशा 8-2 अशी आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल करत असताना पण दुर्दैवाने तिच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली.
पण ही धाडसी मुलगी मागे हटली नाही, मैदान अजिबात सोडलं नाही…..
निशाला हात वर करणंही अवघड होतं, पण सामन्यात फक्त १ मिनिट उरला होता आणि निशाला कसा तरी सामना संपवावा लागला, कारण आघाडी आधीच प्रस्थापित झाली होती. अशा अवस्थेत निशा रडायला लागली आणि अश्रू ढाळत ती पुन्हा सिंहिणीसारखी उभी राहिली आणि लढायला तयार दिसली. मात्र त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे कोरियन कुस्तीपटूने संधीचा फायदा घेत दमदार चाली करत 10-8 अशी आघाडी घेतली. अशा प्रकारे निशा हा सामना हरली. लोक तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
असह्य वेदना होत असतानाही निशा दहियाने वैद्यकीय मदत घेत खेळत राहून 8-2 अशी मोठी आघाडी मिळवली, मात्र अखेरच्या क्षणी प्रतिस्पर्ध्याने तिच्या कमकुवतपणाचा फायदा घेत प्रथम गुणसंख्या बरोबरीत आणली आणि नंतर आघाडी मिळवून तिच्यावर विजय मिळवला. सामना संपल्यानंतर लगेचच निशाला स्कॅनसाठी गेम्स व्हिलेजमध्ये नेण्यात आले, स्कॅनमध्ये भारतीय स्टार रेसलरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले.
वेदनांशी झुंजूनदेखील देशासाठी एका हाताने लढली, पण गुडघे टेकले नाहीत…
दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेबाहेर झाली. आता तिला कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली नाही.
निशा 8-2 अशी आघाडीवर होती आणि सामना जिंकण्याच्या अगदी जवळ होती, पण दुखापतीमुळे तिला नमते घ्यावे लागले. महिलांच्या फ्रीस्टाइल ६८ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उत्तर कोरियाची कुस्तीपटू पाक सोल गम हिच्याशी झाला. ज्यामध्ये तिचा 8-10 असा पराभव झाला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू निशा दहियाचा वेगळाच जोश मात्र अवघ्या जगाने पाहिला.