- भारतीय तिरंदाज हरविंदर सिंगची ऐतिहासिक कामगिरी
- भारताने मिळवली एकूण २४ पदके
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पॅरीसमधून
भारतीय तिरंदाज हरविंदर सिंग याने भारताच्या क्रिडा इतिहासातील एक अनोखा रेकॉर्ड सुवर्णक्षरांनी लिहिला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदरने सुवर्ण लक्ष्य भेदलं आहे. ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यामुळे क्रिडा इतिहासात ना भूतो अशी कामगिरी पार पडली आहे.
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये हरविंदर सिंग याने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय. हरविंदरने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला.
कसा रंगला सामना?
हरविंदर सिंगपुढे पोलंडच्या लुकासचे आव्हान होतं. हरविंदर सिंगने पहिला सेट जिंकला अन् सुवर्ण पदकाकडे वाटचाल केली. हरविंदरने त्यानंतर इतर दोन्ही सेट जिंकले अन् गोल्ड मेडलवर नाव कोरलं.
भारताने पॅरालिंपिक सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत आतापर्यंत २४ पदकांची लयलूट केलेली आहे आणि आपला दिमाखदार प्रवास सुरू ठेवला आहे.
उत्तम प्रयत्न