- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १४० स्वयंसेवकांचा सहभाग
- सामाजिक सहभागातून निर्मल प्रदक्षिणा उपक्रम
स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे थेट नाशिकमधून…
त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभागाच्या माध्यमातून नुकताच ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर निर्मल प्रदक्षिणा उपक्रम राबविण्यात आला. त्यात १४० स्वयंसेवकांनी सहभाग घेत पाच ट्रक कचरा गोळा केला आणि संपूर्ण रस्ता चकाचक करण्यात आला.
श्रावणी सोमवारी सर्वत्र महादेवाच्या देवळात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. नुकतीच सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी गर्दी केली होती. जशी जशी गर्दी वाढते त्याप्रमाणे कचऱ्याचे प्रमाणही वाढते असे लक्षात आले.
त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभागाच्या माध्यमातून ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावर निर्मल प्रदक्षिणा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी हरसूल भागातून १२० महिला -पुरुष तसेच त्र्यंबकेश्वर मधून २० तरूण असे एकूण १४० स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उपक्रमात पाच ट्रक्टर कचरा गोळा झाला. कच-यात प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिक पिशव्या तसेच गुटख्याचे वेष्ठन, मद्याच्या बाटल्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या. हा सर्व कचरा त्र्यंबक नगर परिषदेच्या कचरा डेपोत टाकण्यात आला. सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत स्वयंसेवकांनी हे सेवाकार्य केले. निर्मल प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, तसेच तहसील कार्यालय यांचे सहाय्य झाले. सेवा भारतीचे तीन कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.