• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

Admin by Admin
September 23, 2025
in Inspirational
1

फुलांनी बहरणारा बस स्टॉप
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे केरळहून
केरळच्या वायनाडमधल्या नम्बिकोल्ली गावातला हा बस स्टॉप आता फक्त थांबण्याची जागा नाही, तर प्रत्येक पावसाळ्यात फुलांनी नटणारा बसस्टॉप बनला आहे. जपान देशातील ही संकल्पना आता भारतात देखील रुजत असल्याचे दिसत आहे.
कधी काळी तो तुटलेल्या छपरासह, कचर्‍याने भरलेला आणि गुंडांचा अड्डा असलेला हा बसस्टॉप आज इन्स्ट्राग्राम हॉटस्पॉट बनला आहे. याचे कारण पावसाळ्यात त्याचं छत फुलवणारी सुंदर जांभळी फुलं!
या सौंदर्यामागे दोन सामान्य माणसांची असाधारण मेहनत आणि वर्षानुवर्षे केलेली काळजी आहे. जॉय कोट्टुक्कारा, जे एक मजूर आहेत आणि ई. एस. वर्गीज एक शेतकरी़ या दोघांनी १२ वर्षांपूर्वी या बस स्टॉपवर एक जंगली ंफुलांचे (गार्लिक वाइन) रोप लावले होते. सुरुवातीला फक्त साप दूर राहावेत म्हणून लावलेली ही वेल, आता दरवर्षी फुलून हा बस स्टॉप सुंदर बनवत आहे. दररोज पाणी, निगा राखत आणि प्रेम देत त्या दोघांनी अगदी एखाद्या मुलासारखं त्याचे संगोपन केले आहे. याचे फलित म्हणजे हळूहळू ते रोप मोठे झाले. दरवर्षी पावसाळ्यात त्यावर जांभळी फुले फुलू लागली. या ठिकाणाचे सौंदर्य लोकांना आकर्षित करू लागले. आता जेव्हा कोणी तेथे बसची वाट पाहतो, तेव्हा आधी मोबाइल काढुन त्याचे फोटो काढतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या वेलीची काळजी केवळ जॉय आणि वर्गीज यांच्यापुरती मर्यादित नाही तर आजूबाजूचे रिक्षाचालक, दुकानदार, शाळा आणि ऑफिसला जाणारे लोक देखील त्यात आपले योगदान देत आहेत. हा बस स्टॉप आता अशा सामूहिक प्रयत्नाचे एक उत्तम उदाहरण बनला आहे.जेथे प्रत्येकजण त्याला सुशोभित करण्यात माणुसकीचे सौंदर्य अनुभवत आहे.

Previous Post

‘नाचणीचे गाव कुसुंबी’ आले प्रकाशझोतात

Next Post

‘रॅम्पमायसिटी’ मुळे दिव्यांगांचे जीवन बनले सुसह्य

Admin

Admin

Next Post
‘रॅम्पमायसिटी’ मुळे दिव्यांगांचे जीवन बनले सुसह्य

'रॅम्पमायसिटी' मुळे दिव्यांगांचे जीवन बनले सुसह्य

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    5 months ago

    💐💐🌱

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.