• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

वाराणसीमध्ये बनतोय ‘संगीत पथ ‘

Admin by Admin
November 1, 2025
in Positive news
0
वाराणसीमध्ये बनतोय ‘संगीत पथ ‘

बनारस घराण्याच्या कार्याचा होणार गौरव
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे काशीहून
वाराणसीतील फुलवरिया तिराहा येथून सेंट्रल जेलच्या भिंतीपर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आणि १५ फूट रुंद ‘म्युझिकल पाथ वे’ तयार करण्यात येत आहे. वाराणसी विकास प्राधिकरण काशीच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी हा ‘म्युझिकल पाथ वे’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरून जाताना बनारस घराण्याची परंपरा जपणारे संगीत येणार्‍या जाणार्‍यांच्या कानावर पडणार असून ज्यामुळे येथे येणार्‍या लोकांना एक वेगळी अनुभूती मिळेल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री रवींद्र जायसवाल यांनी दिली.
ही योजना पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने राबवली जात असून या पथवर सतत बनारस घराण्याचे संगीत वाजणार आहे. येथे देश-विदेशात प्रसिद्ध बनारस घराण्याच्या महान संगीतकारांची चित्रे व जीवनचरित्रे असतील. शहनाई, तबला यांसारखी वाद्ये देखील येथे प्रदर्शित केली जातील. शहराच्या सौंदर्यीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वतंत्र ‘म्युझिकल सेल्फी पॉइंट’ देखील उभारण्यात आला आहे. ज्यामध्ये कलात्मक भित्तिचित्रे आणि शहराच्या संगीत वारशाचा सन्मान करणारा सेल्फी झोन असणार आहे.
हा संगीत पथ फक्त त्या रस्त्यांच्या कडेला बांधला जाईल ज्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही. तसेच गिलट बाजार चौकापासून पोलिस लाईन चौक, चौकाघाट, लहुराबीर मार्गे कालभैरव मंदिरापर्यंत मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून, ज्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी रस्त्याच्या कडेलाही संगीत पथ उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा संगीत पथ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अत्यंत प्रभावित झाले असून काशीच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांवर दिसले पाहिजे, म्हणून अशा संगीत पथांची उभारणी करावी असे निर्देश दिले.
याविषयी वाराणसी विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष पुलकित गर्ग म्हणाले, सध्या सेंट्रल जेल रोडनंतर जेएचव्ही मॉलपासून करियप्पा मार्गापर्यंत संगीत पथ तयार केला जात आहे. लवकरच गिलट बाजार चौकापासून कालभैरव मंदिरापर्यंतचा संगीत पथ बांधला जाणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव तयार केला जाईल. त्यानंतर इतर मार्गांवरही ही योजना राबवली जाईल.

Previous Post

सैनिकांचे गाव…मिलिटरी आपशिंगे

Next Post

निवृत्तीनंतर छंदालाच नवी ओळख देणारे कमलाकर पोद्दार

Admin

Admin

Next Post
निवृत्तीनंतर छंदालाच नवी ओळख देणारे कमलाकर पोद्दार

निवृत्तीनंतर छंदालाच नवी ओळख देणारे कमलाकर पोद्दार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.