स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी दिल्लीतून
1972 ला जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिंपिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर यांना केंद्र सरकारने जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनु भाकर आणि डी गुकेश यांना जाहीर झाला आहे.
भारत देशासाठी विविध क्रीडा प्रकारात २०२४ या वर्षात विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यात चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक प्रवीण कुमार या चौघांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकर हिने एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळवून इतिहास घडवला होता. तर हॉकी टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्यांदा मेडल मिळवलं होतं. यासोबत चेसमध्ये विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान डी गुकेश याने मिळवला होता. या कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात येणार आहे.