• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अशांत मनाला शांत करणार ‘माईंड ऑफ’ यंत्र

Admin by Admin
September 11, 2025
in Success Story
0
अशांत मनाला शांत करणार ‘माईंड ऑफ’ यंत्र

नाशिकच्या इंजिनिअरने बनवले मन शांत बनवण्याचे पहिले यंत्र
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे नाशिकहून
नाशिकच्या विजय ठाकूर या तरुणाने मनाचे ऑफ बटण शोधून काढले आहे. त्याने जगातील पहिले मनाला शांत करण्याचे यंत्र बनवले आहे. ‘माईंड ऑफ’ हे मेंदूला नियंत्रण करून मनाला शांती देण्याचे कार्य करते.
विजय ठाकूर हा इंजिनिअरिंग झालेला तरुण आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना अभ्यासात येत असलेल्या अडचणी या थेट मनाशी जुळलेल्या आहेत. मन शांत नसेल तर अभ्यासही होत नसतो असे जेव्हा त्याला समजले तेव्हापासून हा तरुण अशा काही अनोख्या शोधात लागला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक संशोधन केले आणि काही वर्षांपूर्वी त्याने हे जगातले पहिले मनाला शांत करण्याचे यंत्र बनवले आहे. ज्याने आपण आपले मन हे स्थिर करू शकणार आहोत. त्याला पेटंट मिळाले असून हे यंत्र आता विविध ४७ देशात वितरित झाले आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य हा व्यस्त झालेला आहे. या दगदगीच्या जीवनात आपले मन सुद्धा विचाराने धावत असते आणि यामुळे याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि शरीरावर होत असतो. दिवसभर विचार थांबत नाहीत, झोप लागत नाही, मेंदू जड वाटतो आणि मन नेहमीच कुठेतरी भूतकाळात किंवा भविष्याच्या काळजीत अडकलेले असते. यामुळे आजच्या काळाचा सर्वात मोठा मानसिक आजार बळावत चाललाय. लाखो लोक मेडिटेशन तसेच मन शांत करण्यासाठी कोर्सेस करतात, थेरपी घेतात पण मेंदू शांत होत नाही. त्यावर एक नामी शक्कल या तरुणाने शोधून काढली आहे.
कसे सुचले माईंड ऑफ डिव्हाईस
आपण मोबाईल वापरतो काही कालावधीनंतर तो स्लो होतो, कधी हँग देखील होतो. गरम होतो मग आपण काय करतो? तर आपण एकच रीसेट बटन दाबतो आणि तो पुन्हा फुलफ्लेजमध्ये कामाला लागतो. मग आपल्या मनासाठी असं एखादं रीसेट बटन हवं नाही का? ह्या विचारापासूनच ‘माईंड ऑफ’ या संकल्पनेला जन्म दिला गेला.
संशोधनावर आधारित इनोव्हेशन
माईंड ऑफचा पाया ध्वनीलहरींचा मेंदूवर होणारा परिणाम करणे न्यूरोसायन्स (श्वासाचा भावनांवर होणारा परिणाम) आणि लयबद्ध गाणी (तालावर मेंदूची नैसर्गिक समायोजन प्रक्रिया) या शास्त्रावर आहे. आपण मेडिटेशन जमत नाही म्हणून स्वतःलाच दोष देतो. पण समस्या आपल्या शिस्तीत नाही, समस्या मेंदूच्या ब्रेनवेव्ह पॅटर्नमध्ये असते. ‘माईंड ऑफ’ मेंदूला वेगाने योग्य प्रिâक्वेन्सीवर आणतो, त्यामुळे मेडिटेशन, फोकस आणि झोप आपोआप सोपी होते.
असे कार्य करते यंत्र
आपला श्वास हा मेंदूसाठी सर्वात नैसर्गिक सिग्नल आहे. त्यामुळे हे यंत्र वापरकर्त्याचा श्वास रिअल-टाईममध्ये कॅप्चर करतो आणि त्याचा नैसर्गिक आवाज त्यालाच ऐकवतो. त्याचवेळी खास निवडलेल्या बायनॉरल प्रिâक्वेन्सी ऑडिओ ट्रॅक मेंदूच्या लहरींना बीटा ब्रेनवेव्ह मधून अल्फा/थीटा मध्ये नेतात. याचा परिणाम काही सेकंदांत मन शांत होतं आणि मेडिटेशन आपोआप सुरू होतं आणि तणावाचे परिणाम कमी होऊ लागतात. अ‍ॅपवर बसून श्वास मोजण्याची, डोळे मिटून ध्यान करण्याची गरज नाही हे यंत्र ते सगळं आपोआप घडवतो.
मेंदूच्या लहरींमध्ये बदल होऊन तो जलदपणे बीटा (उत्तेजित / ताण) पासून अल्फा / थीटा (शांत / ध्यान) स्थितीकडे जातो. त्यामुळे मेडिटेशन जमत नसेल त्या लोकांनाही पहिल्याच सत्रात फरक जाणवतो आणि पाच दिवसांच्या नियमित वापरात भावनांवर ताबा परत येण्याचे पहिले संकेत दिसतात. अशा पद्धतीने हे ‘माईंड ऑफ’ मशीन काम करते.

Previous Post

२२ भाषांतील १५ लाख पुस्तकांचे अद्वितीय ग्रंथालय

Next Post

इथे चहाच्या टपरीवर मिळते बाळांसाठी मोफत दूध

Admin

Admin

Next Post
इथे चहाच्या टपरीवर मिळते बाळांसाठी मोफत दूध

इथे चहाच्या टपरीवर मिळते बाळांसाठी मोफत दूध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.