• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

दृष्टिहीन मतदारांसाठी ‘ब्रेल’मधून ‘स्लिप’

Admin by Admin
November 9, 2024
in my news pune
0
दृष्टिहीन मतदारांसाठी ‘ब्रेल’मधून ‘स्लिप’

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात यंदा २६८ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी चार वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे असणार आहेत. कारण तिथे दृष्टिहीन मतदारांसाठी खास ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठी (स्लिप) दिली जाणार आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी ही माहिती दिली. अहिल्यादेवी प्रशालेत सर्व महिला कर्मचारी असलेले पिंक मतदान केंद्र असेल. हिरालाल प्रशालेजवळ प्रार्थना समाजाच्या वारसा वास्तूमध्ये हेरिटेज मतदान केंद्र असेल. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील मतदान केंद्र यूथ पोलिंग स्टेशन असून, तिथे सर्व युवा कर्मचारी असतील. तर महाविद्यालयाच्या मागील दिव्यांग शाळेमध्ये दिव्यांग पोलिंग स्टेशन असून, तिथे दिव्यांगांसाठी आवश्यक व्यवस्था असेल; तसेच तिथे दिव्यांग कर्मचारी कार्यरत असतील.
याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते म्हणाल्या, बारा उमेदवार नशीब अजमावत असलेल्या या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक मतदाराला त्याच्या मतदान केंद्राची माहिती असलेली चिठ्ठी (व्होटर स्लिप) दिली जाते. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीमध्ये मतदार चिठ्ठी बनविण्यात आली आहे. कसबा पेठ मतदारसंघातील १०८ दृष्टिहीन मतदारांना ही चिठ्ठी दिली जाणार आहे.

अंथरूणाला खिळून असलेले आणि मतदान केंद्रावर पोहोचू न शकणारे दिव्यांग अशी १९७ जणांची यादी कसबा मतदारसंघाच्या पेठ विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन नियमांचे पालन करून मतदान घेतले जाणार आहे.
कसबा मतदारसंघातर्फे पेठ विधानसभा मतदार जागृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.. सावधान मागासवर्गीय सहकारी गृहरचना संस्था येथील आचार्य विनोबा भावे मतदान केंद्रातून बुरूड आळीतील महाराणा प्रताप शाळेत स्थलांतर झालेल्या मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच मतदानाची शपथ घेण्यात आली.

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे कौतुक

या मतदारसंघासाठी सध्या १३९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी, नोडल अधिकारी प्रा. संदीप नर्डिले आणि श्यामल चिनके यांच्या सहकार्याने एक क्यूआर कोड बनवला आहे. त्या आधारे अवघ्या काही मिनिटांत या कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाते. त्यामुळे खर्चातही मोठी बचत होत असून, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Previous Post

युपीतील कुंभारांच्या पणत्यांचा जगभरात संचार!

Next Post

पुण्याच्या टेकडीवर सापडला उडी मारणारा कोळी!, जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे संशोधन

Admin

Admin

Next Post
पुण्याच्या टेकडीवर सापडला उडी मारणारा कोळी!, जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे संशोधन

पुण्याच्या टेकडीवर सापडला उडी मारणारा कोळी!, जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे संशोधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.