- रशियातील सर्वांत उंच माउंट एलब्रूस शिखर केले सर
- महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मोठी कामगिरी
- उंच पर्वतावर दुमदुमले महाराष्ट्र गीत
स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे रशियातून
रशियातील सर्वोच्च शिखर म्हणून प्रसिद्ध असणारे ‘माऊंट एल्ब्रूस’ बेस कॅम्प महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी सर केले आहे. या गिर्यारोहकांच्या टीमने रशियातून मोहिमेला सुरुवात केली. पाच दिवस गिर्यारोहण करत 18 हजार 510 फूट म्हणजेच 5 हजार 642 मीटर अंतर पार करून गिर्यारोहकांनी ‘माऊंट एल्ब्रूस बेस कॅम्प’वर तिरंगा फडकवला.
गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील या टीमने भारतीय राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायले. टीममध्ये छत्रपती संभाजीनगर येथून दत्ता सरोदे, प्रशांत काळे, किशोर नवकर, विनोद विभुते, सुरज सुलाने, रुपाली कचरे, मैसूर येथील प्रीत केएस, लातूर येथील अजय गायकवाड, सोलापूर मधील आनंद बनसोडे, मध्यप्रदेश येथील चेतन परमार आणि 12 वर्षीय प्रीती सिंग यांचा समावेश होता. ही मोहीम फत्ते करणारे महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक ठरले असल्याचा दावा या गिर्यारोहकांनी केला.
आशिया खंडातील सर्वात मोठे शिखर सर करण्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. रोज नियमित व्यायाम, तिथल्या वातावरणाला अनुकूल अशी तयारी करण्यात आली. महाराष्ट्रातील हा समूह महाराष्ट्रातून रवाना झाला. या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी उत्सवामुळे 360 एक्सप्लोरर समूहाने पुन्हा एकदा साहस आणि देशभक्ती यांचे उत्तम उदाहरण सादर केले. मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माऊंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. तर 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे.
उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला. तसेच, डॉ. प्रशांत काळे यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात शिखर सर केले. तीन तासांत शिखर सर करणारा सुरज सुलाने सर्वात जलद महाराष्ट्रीयन ठरला आहे, तर रुपाली कचरे यांनी 15 ऑगस्ट रोजी शिखराच्या पायथ्यावर महाराष्ट्रगीत गायले. दत्ता सरोदे यांनी माउंट किलीमांजारो आणि माउंट एलब्रूस सर करत पहिले महानगरपालिका कर्मचारी म्हणून आपला ठसा उमटवला आहे.
क्रीडा शिक्षक किशोर नावकर यांनी “गर्ल्स कॅन डू एनीथिंग” या संदेशासह शिखरावर यशस्वी चढाई केली, तर अजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिखरावर पोहोचवली आहे. याशिवाय, चेतन परमार सर्वात लहान युवक आणि मैसूरचे प्रीत अपय्या सर्वात ज्येष्ठ गिर्यारोहक ठरले आहेत. 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या या मोहिमेने भारतीय गिर्यारोहकांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा उंचावली असून, देशाच्या साहसी भावनेचे प्रतीक म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.