• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

भारतीय चित्र जगात भारी!

Admin by Admin
April 3, 2026
in Success Story
0
भारतीय चित्र जगात भारी!

भारतीय चित्र जगात भारी!

भारतीय कलेचा अभिमान- ‘यशोदा आणि कृष्ण’ चित्राने रचला एक नवा इतिहास…
भारतीय कला क्षेत्रासाठी सर्वोत्तम अभिमानाचा क्षण ठरावा अशी ऐतिहासिक घटना नुकतीच घडली आहे.
प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या अजरामर चित्राने लिलावात विक्रमी किंमत मिळवत नवा इतिहास रचला आहे.
प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा जी यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या कलाकृतीने लिलावात तब्बल १६७.२० कोटींचा विक्रम करत इतिहास घडवला. अवघ्या सात मिनिटांच्या अटीतटीच्या बोलीनंतर ही कलाकृती प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी हे चित्र तब्बल १६७.२ कोटी रुपयांना खरेदी केली. जगातील सर्वात महागडी दक्षिण आशियाई कलाकृती ठरली आहे.
हा भव्य लिलाव Saffronart या नामांकित संस्थेमार्फत पार पडला. अपेक्षेपेक्षा अनेकपटीने जास्त बोली लागल्याने भारतीय कलेचा जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

या विक्रीमुळे भारतीय कला बाजारात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. याआधी एम. एफ. हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’ या चित्राने विक्रम नोंदवला होता. जो किरण नाडर यांनी खरेदी केला होता. मात्र ‘यशोदा आणि कृष्ण’च्या विक्रीमुळे तो विक्रम आता मागे पडला आहे.
१८४८ साली केरळमधील किलीमानूर येथे जन्मलेल्या राजा रवी वर्मा यांनी भारतीय कलेला एक नवे वळण दिले. भारतीय परंपरा आणि पाश्चात्य चित्रशैली यांचा सुंदर संगम घडवून त्यांनी कलेत वास्तववाद आणला. त्यांच्या चित्रांमध्ये हिंदू पुराणातील कथा आणि देव-देवतांचे जिवंत चित्रण पाहायला मिळते. ‘शकुंतला’, ‘दमयंती’ आणि ‘सरस्वती’ यांसारख्या कलाकृती आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राच्या विक्रीमुळे भारतीय चित्रकलेचा दर्जा आणि मूल्य एक वेगळ्याच उंचीवर पोहोचलेले दिसत आहे. ही फक्त आर्थिक उलाढाल नसून भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या इतिहासातील जागतिक सन्मानाची मोठी पायरी मानायला हवी.

Previous Post

माजी सैनिकाची जलसंवर्धनासाठी अनोखी कामगिरी

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.