• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पाॅझिटिव्ह माॅर्निंग ….!

Admin by Admin
March 10, 2025
in Positive news
0
पाॅझिटिव्ह माॅर्निंग ….!

ऑरेंज प्रोसेसिंगचा आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प नागपुरात

पतंजलीने घेतला पुढाकार

 

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे नागपूरहून

 

नेहमीच दुष्काळाने हाल सोसणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना आता समृद्धीची नवीन दारे उघडी होणार आहेत. कारण नागपूरातील मिहान प्रकल्पांतर्गत संत्र्यांवर प्रक्रिया करणारा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पतंजलीच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आलेला असून त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ही माहिती दिली.

नागपुरातील मिहान येथे ‘पतंजलि मेगा फूड एंड हर्बल पार्क’ ऑरेंज प्रोसेसिंग हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या भूमीतून पंतजली नवी कृषी क्रांती आणणार असून देशाच्या शेतकऱ्यांना समृद्धीची नवी दारे उघडणार आहे. असे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,  हा फूड प्रोसेसिंगचा सिंगल पाॅईंट आणि आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ठरेल. अनेक संकटावर मात करीत हा प्रकल्प सुरु होत आहे.

800 टन प्रतिदिन प्रोसेसिंग क्षमता

या प्रकल्पाची प्रोसेसिंग क्षमता 800 टन प्रतिदिन असून ज्यात ए ग्रेड सोबत बी आणि सी ग्रेडचे ऑरेंज प्री- मॅच्युर उत्पादन आणि वादळाने तुटणाऱ्या संत्र्याचे देखील प्रोसेसिंग होणार आहे. आमचा हा प्लांट झिरो वेस्टेज सिस्टीमवर काम करणार आहे. याचे काम संत्र्याच्या सालीपासून सुरू होते. संत्र्यांच्या सालीपासून वॉलिटाईल तसेच फ्रेगरेन्स ऑईल काढणार आहे.परदेशी तंत्र आत्मसात केले आहे. यासाठी स्थानिक लोकांना रोजगार देणे हीच प्राथमिकता असून यासाठी या प्रकल्पात या विभागातील प्रत्येक गावातील जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांच्या पतंजली संपर्कात आहे. सामान्यांना रोजगार देणे हेच उद्दिष्ट आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकरी समृद्धशाली होणार आहे असे देखील बाळकृष्ण यांनी सांगितले.

उत्कृष्ट निर्यातक्षम उत्पादने बनणार

या प्लांटमध्ये आधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. यात पॅकेजिंग लाईन्स, टेक्नोपॅक आणि प्रगत संशोधन प्रयोगशाळा यांचा समावेश आहेत.  कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार, संत्रा, लिंबू, आवळा, डाळींब, पेरू, द्राक्षे, भोपळा, गाजराचा रस, आंबा आणि संत्र्याचा गर आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट देखील येथे बनवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

भाजीपाला विकून शेतकरी झाले श्रीमंत

त्यांच्या कमाईने मोडले सर्व विक्रम

 

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे भतौलीहून

 

कैमूरच्या रामगढ ब्लॉकमधील भतौली गावात भाजीपाला लागवडीने शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. शेतीच्या नव्या तंत्रामुळे येथील शेतकरी आता इतर शेतकऱ्यांना शेतीच्या युक्त्या शिकवू लागले आहेत. भाजीपाला लागवडीने ते स्वावलंबी झाले असून इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही त्यासाठी प्रेरीत करीत आहेत.

भतौली गावातील 100 हून अधिक कुटुंबे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे दुर्गावती नदीच्या काठावर भाजीपाला पीक बहरत आहे. शासकीय सुविधा मिळत नसतानाही भतौली गावात भाजीपाला लागवडीतून समृद्धीचे वारे वाहत आहेत. येथे दुधी भोपळा, वांगी, कोबी, टोमॅटो आणि परवल आदी भाजीपाला रोपांची लागवड केली जाते.

भतौली गावात वीस वर्षांपूर्वी गरिबी होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. रामगड मोहनिया पथावरील पानसेरवन दुर्गावती नदीच्या पुलाच्या पश्चिम व पूर्वला 100 एकरहून अधिक क्षेत्र हिरवाईने व्यापलेले आहे.

 

कमाईतील विक्रम मोडले

डहरक, रामगड आणि अंशी मौजा येथे भाजीपाला पिकवणारे भतौलीचे लोक सहा लाख रुपयांहून अधिक जमीन भाडे म्हणून देतात. कमाईच्या बाबतीत इथले लोक विक्रम मोडत आहेत. भतौली गावातील पुरुषच नव्हे तर महिला शेतकऱ्यांनीही शेतीत प्राविण्य मिळविले आहे.  दोघांची ही पारंपरिक शेती पाहून रस्त्यावरून जाणारे लोकही त्यांच्या कौशल्याला सलाम करतात. गावात 50 मल्लाह कुटुंबे, 17 पासवान कुटुंबे, 10 कुशवाह कुटुंब आणि 15 इतर कुटुंबे आहेत.

भतौली येथील रामबिलास चौधरी, संजय चौधरी, चुन्नू कुशवाह हे शेतकरी रामगड मोहनिया पथातील दैत्रबाबा स्थळाजवळ टोपल्यांमध्ये भाजीपाला पॅक करून ट्रक आणि जीपमध्ये दररोज भरतात. दुर्गावती नदीच्या दुतर्फा भाजीपाला रोपांना सिंचनासाठी 60 डिझेल पंप सतत चालू असतात.

जमीन कोरडी असल्याने पाण्याची नेहमीच गरज भासते. पुलाच्या पूर्व टोकाला वीज आहे. सध्या एक शासकीय ट्यूबवेलही कार्यरत आहे. पण पश्चिम टोकाला वीज नाही. त्यामुळे नदीत बसविलेल्या डिझेल पंपाच्या साहाय्याने त्यांना शेताची तहान भागवावी लागत आहे.

न्यूझीलंडला धूळ चारत भारतच विश्वविजेता

4 गडी राखत मिळविला अभूतपूर्व विजय

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे दुबईहून

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि आयसीसी जेतेपद जिंकले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी केली आणि टीम इंडियाला 252 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघाने संयमाने ते पार केले आणि न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

टीम इंडियाने जिंकलेली सातवी आयसीसी ट्रॉफी!

टीम इंडियाची ही सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने 1983 आणि 2011 चा एकदिवसीय वर्ल्ड कप, 2007 आणि 2024 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2002, 2013 आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. त्याने सलग पाच सामने जिंकले आहे.

Previous Post

सहा वर्षाच्या चिमुरडीची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

Next Post

पाॅझिटिव्ह माॅर्निंग…!

Admin

Admin

Next Post
पाॅझिटिव्ह माॅर्निंग…!

पाॅझिटिव्ह माॅर्निंग...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.