• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पायाने पेपर सोडवत केली MPSC परीक्षा पास

Admin by Admin
July 23, 2025
in Positive news
0
नागपूर बनवणार आता अद्ययावत हेलिकॉप्टर

* महाराष्ट्रातल्या वैभवच्या जिद्दीला सलाम

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे नांदेडहुन

जर तुमचा निर्धार असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. हे सिद्ध करून दाखवले आहे नांदेडच्या वैभव पैतवार याने.
वैभव पैतवार हा केवळ एक यशस्वी उमेदवारच नाही तर हजारो तरुणांसाठी एक जिवंत प्रेरणा म्हणून उदयास आला आहे. वैभव पैतवार याने पायाने पेपर सोडवून एमपीएससी परीक्षा पास करून दाखविली आहे.
सिडको कॅम्पसमधील गुरुवार बाजार परिसरात आई आणि भाऊ याच्यासोबत वैभव राहतो. वैभवच्या आईने मजुरी करून फक्त मुलांची भूक भागवली नाही तर, त्यांना योग्य शिक्षण देखील दिले. त्यामुळे असे सांगायला हरकत नाही की, आईच्या कष्टाचे फळ वैभवने दिले आहे.
वैभव याच्यासोबत एका प्रसंग घडला, तेव्हा वैभव दहावी इयत्तेत शिकत होता. 2008 मध्ये पतंग उडवत असताना विजेचा झटका लागला ज्यामुळे वैभव याला दोन्ही हात गमवावे लागले आणि एक क्षणात पूर्ण आयुष्य बदलून गेले. हात गमावले तरी वैभवने मनातील जिद्द गमावली नाही. वेदन सहन करत वैभवने यशाचे शिखर गाठले…

मेहनतीने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

या अपघातानंतरही त्याने हिंमत गमावली नाही आणि पायांनी लिहायला शिकला. त्याने कठोर अभ्यास केला आणि अखेर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. आता तो मुंबईत महसूल सहाय्यक म्हणून काम करणार आहे आणि त्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. वैभवच्या प्रवासाची चर्चा संपूर्ण नांदेडमध्ये होत आहे. त्याचा हा विजय केवळ त्याचा स्वतःचा नाही तर जीवनात येणाऱ्या अडचणींशी झुंजणाऱ्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे. वैभव पैतवार याची कहाणी आपल्याला शिकवण देते. आपण किती दूर जाऊ शकतो हे आपल्या शारीरिक मर्यादा नाही तर आपली इच्छाशक्ती ठरवते.

लहानपणीच वडिलांचे निधन

वैभव दहावीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी वैभव याच्या आईच्या खांद्यावर आली. अशात वैभव देखील मागे हटला नाही. क्लास वन अधिकारी होण्याचे वैभव याचे स्वप्न आहे. सांगायचे झाले तर, प्रतिभा ही कोणावर अवलंबून नसते असे म्हटले जाते, वैभवनेही तेच केले, विजयाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र वैभवचे कौतुक होत आहे.

Previous Post

अमेरिकेतील विहान जिल्हापरिषदेच्या शाळेत गिरवतोय मराठीचे धडे!

Next Post

`तेल्या’ रोखण्यासाठी फळे क्वारांटाईन…

Admin

Admin

Next Post
`तेल्या’ रोखण्यासाठी फळे क्वारांटाईन…

`तेल्या' रोखण्यासाठी फळे क्वारांटाईन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.