• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

संवेदनशीलता जपणारी नरेंद्र मोदी यांची पुणे भेट

Admin by Admin
November 22, 2024
in my news pune
0
संवेदनशीलता जपणारी नरेंद्र मोदी यांची पुणे भेट

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती,पुणेचे अध्यक्ष जयराम फगरे ( वय ९४ ) यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पुण्यात सन्मानपत्र स्वीकारले. नरेंद्र मोदी हिंदी भाषेचे दूत आहेत कारण ते सर्वत्र हिंदीतून संवाद साधतात. म्हणून फगरे यांनी त्यांचा सत्कार पुणेरी पगडी ,शाल, चांदीचे सन्मान चिन्ह देऊन केला.
हा योग १२ नोव्हेंबरच्या मोदीच्या दौऱ्यात आला. १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना सभेनंतर त्यांनी पंधरा मिनिटे पाच जणांसाठी राखून ठेवली होती. त्यावेळी हा दुग्धशर्करायुक्त योग जुळून आला.
एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांनी सप्टेंबरच्या अंकात जयराम फगरे यांच्या कार्यविषयक आणि मोदीजींना भेटण्याची त्यांची इच्छा याविषयी एक लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलींद मेहेंदळे यांनी लिहिला होता. सन्मान चिन्हाचा मजकूर आकाशवाणीचे डॉ सुनिल देवधर यांनी तयार केला होता. याविषयी खासदार मेधा कुलकर्णी यांना रुपाली भुसारी आणि सुनील देवधर यांनी माहिती कळवली होती.


त्यांच्या मदतीने या सगळ्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ठरवली गेली. त्यात पंधरा मिनिटे पंतप्रधानांशी संवाद साधण्याचे भाग्य यांना लाभले .
यावेळी देवधरांनी मोदींना पुस्तके दिली.तर भुसारी यांनी एकताचा दिवाळी अंक मोदींना दिला.नरेंद्र मोदी यांनी एकता मासिक खूप जूने असल्याचे आपल्या स्मरणात आहे असे सांगितले.तसेच एकता मासिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जेष्ठ असणाऱ्या जयराम फगरे यांची इच्छापूर्ती झाली.

Previous Post

भारताची नवी अंतराळझेप! इस्रो चंद्रावर उभारणार अंतराळ स्थानक

Next Post

‘या’ छोट्याशा गावाने देशाला दिले 47 आयएएस, आयपीएस अधिकारी

Admin

Admin

Next Post
‘या’ छोट्याशा गावाने देशाला दिले 47 आयएएस, आयपीएस अधिकारी

'या' छोट्याशा गावाने देशाला दिले 47 आयएएस, आयपीएस अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.