स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाते. अशा या पुण्यात ६४ कलांची देवता असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचे ५० हजार उकडीचे मोदक दिवसाला तयार होतात. पुण्यातील ‘मेढी’ मोदक फॅक्टरीत हे मोदक बनवले जातात.
गणपती उत्सवात याच मोदकांची संख्या १ लाख होते. गेली सतरा वर्षे पुण्यातील ‘मेढी’ कुटुंब हे या ठिकाणी मोदक बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. तसेच काळाची गरज ओळखून तयार करण्यात आलेल्या प्रâोजनच्या मोदकाचीही विशेष मागणी वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. ‘फेस्टिफूड’ ही मनीषा पाटील व पुष्पा पाटील यांची कंपनी महिन्याला २ लाख फो्रजन मोदक तयार करते. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे हातवळणीचे मोदक ते तयार करतात. अतिशय चविष्ट आणि त्यावरून केसर लावलेल्या या मोदकांना पुण्यातील वेगवेगळ्या प्रसिद्ध दुकानामध्ये मोठी मागणी आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात ‘मेढी’मोदक फॅक्टरी आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक महिलांना याद्वारे व्यवसाय उपलब्ध करून दिला जात आह. विशेष म्हणजे इथे गणपतीतच नव्हे तर वर्षातले ३६५ दिवस मोदक मिळतात. सुमारे ४० महिला या ठिकाणी मोदक बनवतात. त्यांना योग्य ते प्रशिक्षणही दिले जाते.
याविषयी कंपनीचे अक्षय मेढे म्हणतात, या मोदकांसाठी जवळपास ३ हजार नारळ दररोज लागतात. पुण्यातील अनेक प्रसिद्ध मिठाई दुकानांना गणेशोत्सवाच्या काळात ‘मेढी’ मोदक कंपनीच्या कारखान्यातून पुरवठा होतो. अतिशय मस्त, दिसायला सुरेख आणि पाहताच क्षणी आपण त्या मोदकांच्या प्रेमात पडू, असा त्यांचा आकार असतो तसेच देशभरातील अनेक मोठमोठे सेलिब्रेटीही या मोदकांचे फॅन आहेत.
याविषयी कंपनीच्या सर्वेसर्वा पुष्पा पाटील म्हणतात, या प्रवासात अनेक चॅलेंजेस येत गेले. त्याच्यावर आम्ही मात करत शेवटी डिसेंबर २०२३ मध्ये आम्ही आमचा प्रॉडक्ट सुरू केला. शंभर मोदकापासून आता महिन्याला दोन लाख मोदक हा आमचा उच्चांक आहे. दोन लाख मोदक हा आम्ही हाताने बनवतो त्यासाठी आम्ही महिलांना ट्रेन केलेलं आहे. मोदक बनवताना ते सगळे एकसारखे बनवले गेले पाहिजे ही काळजी आम्ही घेतली आहे. हे मोदक हॉटेल, केटरर्स, कॉर्पोरेट किचन यांना पुरवले जातात. याचा आस्वाद बाराही महिने लोकांना घेता यावा, म्हणून आम्ही दोन आउटलेट काढले आहेत. एक आउटलेट रांजणगाव महागणपती येथे आहे. दुसरा आउटलेट अल्फा लेवल च्या समोर स्वीट कॉर्नर या नावाने आहे. बारावी महिने लोकांना मोदक खाता यावा म्हणून आम्ही पॅकेट बाजारामध्ये उपलब्ध केले आहेत.
विविध फ्लेवर्स ते उपवासाचा मोदक
मोदक बनविण्यासाठी आंबेमोहोर तांदूळ व उच्च प्रतीचा गूळ वापरा जातो. त्यामध्ये ड्रायप्रâूट, खसखस, जायफळ, वेलची पूड टाकली जाते. पायनापल, मँगो, ड्रायप्रâूट्स, चॉकलेट्स, गुलकंद अशा विविध प्रकारचे मोदक येथे बनवले जातात. त्याचप्रमाणे उपवासाचा मोदकही तयार केला जातो. उपवासाचा मोदक वरईच्या तांदळापासून तयार केला जातो. तसे शुगर फो्रमोदकही या फॅक्टरीमध्ये तयार होतात.