• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

ट्री मॅन ऑफ इंडिया; दरिपल्ली रामय्या

Admin by Admin
November 11, 2025
in Success Story
0
ट्री मॅन ऑफ इंडिया; दरिपल्ली रामय्या

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे तेलंगणाहून
तेलंगणाच्या खय्यम जिल्ह्यातील रेडीपल्लीचे रहिवासी दरिपल्ली रामय्या यांना ‘ट्री मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. ८४ वर्षीय रामय्या यांनी पृथ्वीवर एक कोटीपेक्षा जास्त झाडं लावलीत.
झाडं लावण्यासाठी रामय्या यांच्याकडे बियाणांसाठी पैसे नव्हते. अशावेळी रामय्या यांनी आपल्या मालकीची तीन एकर जागा विकली आणि आपले हे अभियान सुरू ठेवले. झाडे लावण्याचे त्यांचे काम अजूनही सुरू आहे. काही लोक त्यांना ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात. चेट्टू म्हणजे झाड. (तेलगू भाषेत) म्हणून हा ‘झाडं वाला रामय्या’ झाला. आता सगळे त्यांना याच नावानं ओळखतात. आजही ते घरून निघतात तेव्हा बी आणि रोप त्यांच्या सोबतीला असतात. लोक त्यांना वेडे म्हणत पण त्यांच्या कार्याची दखल घेणे सुरू झाल्यावर लोकांनी त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली.
लहानपणापासून रामय्या हे बियाणे गोळा करून झाडे लावत असतं. त्यांच्या आईपासून त्यांनी हा वसा घेतला. ‘झाडं लावा जीवन वाचवा’, असा नारा ते देतात. त्यांनी आपल्या गावातूनच वृक्ष लागवडच्या मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी आपल्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या गावाच्या पूर्व-पश्चिम दिशेला किलोमीटरच्या अंतरावर झाडे लावली. काही दिवसांनी गावाचा आजूबाजूचा परिसर पूर्णपणे हिरवागार झाला. गावाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार केल्यानंतर ते आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊ लागले. तिथे ते झाडे लावू लागले.घराबाहेर पडताना त्यांच्या खिशात नेहमी बियाणे असतात. पडीक जमीन दिसल्यास ते त्याठिकाणी झाडं लावतात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं असून एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारे ते अरण्यऋषी आहेत.
राज्य सरकार झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, झाडं लावण्याचे फक्त आकडे समोर येतात. प्रत्यक्ष झाडं दिसतचं नाही. झाडं जगवली जात नाहीत. परंतु, रामय्या यांनी त्यांचं अख्खं जीवन झाडं लावण्यासाठी घालवली. त्यांनी त्यांच्या विभागाच्या नगरसेवकाला झाडांचे महत्व पटवून दिले. त्या नगरसेवकाच्या मदतीने रामय्याने खय्यम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली. रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतात. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतात.
रामय्यांनी लावलेल्या झाडांत असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. बेल, पिंपळ, कदंब, कडूनिंब, चंदन, रक्त चंदन असे मोठे मोठे वृक्ष रामय्याने लावलेत. त्याचे गाव सगळीकडे हिरवे गार झाले आहे. या कामात रामय्यांच्या पत्नीने खूप मदत केली आहे. ‘टिक’ वृक्षाचं जे बी असते, ते कठीण कवचाच्या आतमध्ये असते आणि ते फोडून ते बी बाहेर काढावे लागते. एकट्या रामय्याने ते फोडण्याचा प्रयत्न केला पण ते बी मिळवायला वेळ बराच खर्च व्हायला लागला. पण या कवच फोडण्याच्या कामात रामय्यांच्या पत्नीने खूप मदत केली झाडांचं संगोपन केलं.
याविषयी रामय्या म्हणतो, मला यातून शांती आणि समाधान मिळते म्हणून मी हे करतो. ‘वृक्षो रक्षती रक्षितः’ म्हणजे वृक्ष त्याचे रक्षण करणार्‍याचे रक्षण करतात असे स्लोगन त्याने तयार केले आहे.
रामय्यायांनी जिल्ह्यातल्या लायब्ररीतून अनेक वृक्ष लागवडीची माहिती देणारी पुस्तके मिळवली. शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करायची याचीही माहिती मिळवली. आता त्यापद्धतीने रोपे तयार करून त्याचे वाटप ते करत आहे. एवढं करूनही ते थांबत नाही तर त्यांनी तेलगू भाषेतली काही स्लोगन तयार केली आहेत. ती त्यांनी गावातल्या भिंतींवर जनजागृतीसाठी छान रंगांनी रंगविली आहेत.
काही व्यक्तींचे ऋण हे कधीच फेडता येत नाहीत. आपण त्या ऋणांप्रती प्रामाणिकपणे कृतज्ञ राहायचे. कारण तोच एक चांगला मार्ग आहे. संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित करत एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणार्‍या या अवलियाला एक सलाम तो बनता है.
रामय्यांची जीवनकाहाणी अभ्यासक्रमात समाविष्ट
दरिपल्ली रामय्या यांच्या कार्याची दखल तेलंगण सरकारने घेतली असून रामय्या यांच्या जीवनाची कहाणी तेलंगणातील सहाव्या वर्गातील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच २०१७ मध्ये रामय्या यांना या कामासाठी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अ‍ॅकेडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीसकडून त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल डॉक्टरेटची उपाधी दिली आहे.

 

Previous Post

लक्ष्मी दा रेल्वे पटरी ओलांडणार्‍यांची करताहेत सुरक्षा

Next Post

‘वैदिक सृजन’ करतेय नैसर्गिक पर्यावरणाचे पुनर्जीवन

Admin

Admin

Next Post
‘वैदिक सृजन’ करतेय नैसर्गिक पर्यावरणाचे पुनर्जीवन

'वैदिक सृजन' करतेय नैसर्गिक पर्यावरणाचे पुनर्जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.