• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

फिरत्या चाकावर उपलब्ध होतोय ज्ञानाचा खजिना

Admin by Admin
November 8, 2025
in Inspirational
0
फिरत्या चाकावर उपलब्ध होतोय ज्ञानाचा खजिना

रिक्षाचालक रूजवीत आहेत वाचनसंस्कृती
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बंगळूर व पुण्याहून
बेंगळुरूमधील डॅनियल मरोडोना आणि पुण्यातील प्रशांत कांबळे हे दोघेही रिक्षाचालक रिक्षात मोफत ग्रंथालय सुरू करून वाचनसंस्कृती रूजवीत आहेत. त्यांनी त्यांच्या रिक्षाला फिरत्या ग्रंथालयात रूपांतरित केले असून ते तेथे प्रवाशांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देत आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे ते दोघेही चर्चेत आहेत. वाचकांना दर्जेदार साहित्याचे खाद्य पुरवत असल्यामुळे कौतुकासही पात्र ठरत आहेत. या कामगिरीमुळे ते रिक्षा प्रवाशांना वाचनासाठी आणि विचार करण्यासाठी देखील प्रोत्साहित करताना दिसत आहेत.
प्रवासादरम्यान वेळ सत्कारणी लागावा आणि प्रवाशांना वाचनाची गोडी लागावी, हा या उपक्रमामागील त्यांचा मुख्य उद्देश आहे.
बेंगळुरूमधील डॅनियल मरडोना हे कन्नड मीडियमचे विद्यार्थी होते. मात्र ते नोकरीसाठी गेलेल्या मुलाखतीत नाकारले गेले. इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. मात्र, त्यांनी हार न मानता १० वर्षे सातत्याने इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे सुरू ठेवले आणि इंग्रजी विषयात प्रवीण झाले. कालांतराने त्यांनी ऑटोरिक्षा घेतली आणि आज महिन्याला ४० हजार रूपये कमवित आहेत. त्यांनी रिक्षात अनेक प्रकारची पुस्तके ठेवली ज्यात अनेकदा विचारांना चालना देणार्‍या पुस्तकांचाही समावेश आहे. ज्यामध्ये फिलॉसॉफी, सायकॉलॉजी या पुस्तकांचा देखील समावेश आहे. त्यांनी प्रवाशांना पुस्तके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक फलक लावलेला आहे, ज्यात ‘सर्वांसाठी विनामूल्य, तुमची इच्छा असल्यास घ्या’ असे लिहिले आहे.
याविषयी डॅनियल मॅरोडोना म्हणतात, एक आशादायक विचार तुमचे वाईट दिवस पालटू शकतो.
पुण्यातील रिक्षाचालक प्रशांत कांबळे यांना देखील वाचनाची आवड असल्याने ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर वाचण्यासाठी त्यांच्या ऑटो रिक्षात काही पुस्तके ठेवत असत. हळूहळू त्यांना जाणवले की त्यांच्या काही प्रवाशांनाही पुस्तके वाचायला आवडत आहेत.
एके दिवशी कांबळे यांची प्रियंका चौधरी यांची भेट झाली, ज्या एका ओपन लायब्ररी उपक्रमासाठी काम करतात. चौधरी यांनी कांबळे यांना त्यांच्या ऑटो-रिक्षात एक छोटे ग्रंथालय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.
कांबळे गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या ऑटो-रिक्षात फिरते ग्रंथालय चालवत आहेत. प्रवास करताना हजारो लोकांना त्यांच्या ग्रंथालयाचा फायदा झाला आहे आणि ते मोफत पुस्तके देखील वाटतात. काही प्रवासी त्यांच्या उदात्त उपक्रमासाठी पुस्तके दान देखील करतात.
याविषयी प्रशांत कांबळे म्हणाले, ‘माझ्या ऑटो-रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या ग्रंथालयाची कल्पना खूप आवडली आहे. त्यांच्यापैकी बरेच जण ऑटो रिक्षा भाड्याने घ्यायची असेल तर मला फोन करतात कारण मी माझ्या गाडीत पुस्तके घेऊन जातो. प्रवास करताना ते पुस्तके उलटून पाहतात.’

‘आमचा प्रयत्न सामान्य लोकांमध्ये मराठी भाषा लोकप्रिय करण्याचा आहे. आमच्या खुल्या ग्रंथालय प्रणालीच्या मदतीने आम्ही लोकांना मराठीतील पुस्तके उपलब्ध करून देत आहोत. या उपक्रमाद्वारे आम्ही एक फिरती ग्रंथालय देखील सुरू केले आहे आणि प्रशांत कांबळे यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आमच्या मदतीने, आता त्यांच्या ऑटो-रिक्षात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत आणि वाचक त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत.
प्रियंका चौधरी

Previous Post

शाळांना वाचविण्यासाठी सिद्धेश लोकरे निघाला स्कुटीवर

Next Post

लक्ष्मी दा रेल्वे पटरी ओलांडणार्‍यांची करताहेत सुरक्षा

Admin

Admin

Next Post
लक्ष्मी दा रेल्वे पटरी ओलांडणार्‍यांची करताहेत सुरक्षा

लक्ष्मी दा रेल्वे पटरी ओलांडणार्‍यांची करताहेत सुरक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.