• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

विक्रम साराभाई पदक मिळविले पहिल्या भारतीय महिलेने

खगोलशास्त्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल केले सन्मानित

Admin by Admin
August 8, 2026
in Inspirational
0
विक्रम साराभाई पदक मिळविले पहिल्या भारतीय महिलेने

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बंगळुरूहून

भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना कॉस्पर विक्रम साराभाई पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आणि एकूण चौथ्या भारतीय शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. इटलीतील फ्लोरेन्स येथे २०२६ रोजी झालेल्या ४६ व्या कॉस्पर महासभेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार कमिटी ऑन स्पेस रिसर्च आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्याकडून संयुक्तपणे दिला जातो. विकसनशील देशांमधील अंतराळ संशोधन आणि खगोलशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो.

डॉ. अन्नपूर्णी या बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (आयआयए) च्या संचालिका आहेत. तारकीय लोकसंख्या, ॲस्ट्रोसॅट नाविन्यपूर्ण मोहीम आणि हॅन्ले डार्क स्काय रिझर्व्हच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

याविषयी डॉ.अन्नपूर्णी सुब्रमण्यम म्हणाल्या की, “हा पुरस्कार मिळाल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. खगोलभौतिकशास्त्रातील संशोधन, भारतीय अंतराळ मोहीम ॲस्ट्रोसॅट, अत्याधुनिक खगोलशास्त्रीय सुविधा आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील माझ्या योगदानाची ही पोचपावती आहे.”

याआधी हा पुरस्कार या यू. आर. राव (१९९६), गुरबक्ष सिंग लखिना (२०१४) आणि अनिल भारद्वाज (२०२४) यांना मिळाला आहे.

Previous Post

अहमदाबादमध्ये साकारले पहिले ‘ट्री-इंटीग्रेटेड’ ग्रीन बसस्टॉप

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.