• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अशिक्षित आजींचा सुशिक्षित प्रवास सुरू

Admin by Admin
November 14, 2025
in Inspirational
0
अशिक्षित आजींचा सुशिक्षित प्रवास सुरू

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुरबाडहून
मुरबाडमधील शेलारी आणि म्हाडस पाडा या गावांमध्ये ‘आजीबाईंच्या शाळे’तून अशिक्षित आजींचा सुशिक्षित प्रवास सुरू झाला आहे. शिक्षिका शीतल मोरे आणि योगेंद्र बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आजीबाई साक्षरतेचे धडे गिरवीत आहेत. येथे वय वर्ष ६० ते ९७ वयोगटातील आज्या शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र येत आहेत. या उपक्रमांमुळे अशिक्षित आजीबाईं साक्षरतेच्या मुळ प्रवाहात येत आहेत.
सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक योगेंद्र बांगर यांच्या संकल्पना व प्रयत्नांतून कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्ट संचलित जगातील पहिल्या आजीबाई शाळेतील शिक्षक शीतल मोरे या दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत. गावात त्या सर्वात सुशिक्षित होत्या, त्यामुळे त्यांची शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली. गावातील प्रकाश मोरे यांच्या जागेत पर्यावरणस्नेही झोपडी उभारून त्यात आजीबाईंची शाळा भरू लागली. तेथे आजींबाई मागील ९ वर्षांपासून शिक्षण घेत आहेत.
आम्हाला लिहता वाचता येत असते तर, शिवजयंतीच्या आनंदोत्सवात आम्हीही सहभागी झालो असतो’ अशी खंत काही वर्षांपुर्वी या आजींनी व्यक्त केली होती. यातूनच ‘आजीबाईंची शाळा’ या अनोख्या उपक्रमास सुरूवात होऊन आजपर्यंत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे मंदिरातील अध्यात्मात न रमता शाळेत रमण्याचा ट्रेंड या आजीबाईंनी सुरू केला आहे. येथील आजीबाईंच्या शाळेला सुरुवात झाली असून येथे त्यांना बाराखडी आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवले जाते आहे. सुरुवातीला दोन तास आणि नंतर कामाच्या सोयीनुसार शनिवार-रविवार असे दोन दिवस शाळेची हजेरी लावली जात आहे.
निरक्षर महिलांना शिक्षण देण्यासाठीही विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये मध्यंतरी एक हजार महिलांसोबत स्वाक्षरी शिकवण्याचे कार्य पार पडले. आता, यामध्ये कातकरी महिलांसाठी ‘आईची शाळा’ हा उपक्रम राबविला जात आहे.
९७ वर्षाच्या आजीचा सहभाग
या गावातील आजीबाईंच्या शाळेत ३० आजी शिक्षण घेत आहे. काही आजी कालवश झाल्यास त्यांच्या जागी इतर आजी सहभागी होतात. शाळेत सध्या ९७ वर्षांची हौसा केदार आजी शिक्षण घेत आहे. आजीबाईंच्या शाळेत शिक्षणासोबतच क्रीडा महोत्सव घेतला जातो. त्यात आजी कबड्डी, खो-खो सारखे खेळ खेळतात. हस्तकला, चित्रकला,रांगोळी यांसारख्या स्पर्धा घेतल्या जातात.
जपाननेही घेतली दखल
या शाळेची जपाननेही दखल घेतली असून जपानमधील अभ्यासकांनीही या शाळांना भेट दिली आहे. ज्यामुळे मुरबाडच्या आजीबाईंचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक मजबूत झाला आहे. मुरबाडच्या आजीबाईची शाळा आता लवकरच जपानी भाषेतून देखील जगभर गौरविली जाणार असल्याने मुरबाड तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे. या गौरवासाठी शाळेच्या शिक्षिका शितल मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपभाई दलाल यांनी त्यांचे आभार मानले.

Previous Post

धान्य बँक गरजवंतासाठी ठरतेय ‘संजीवनी’

Next Post

युवा परिषद ५.० चे शानदार उद्घाटन, राज्यभरातून युवकांची उपस्थिती

Admin

Admin

Next Post
युवा परिषद ५.० चे शानदार उद्घाटन, राज्यभरातून युवकांची उपस्थिती

युवा परिषद ५.० चे शानदार उद्घाटन, राज्यभरातून युवकांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.