• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

शाळांना वाचविण्यासाठी सिद्धेश लोकरे निघाला स्कुटीवर

Admin by Admin
November 6, 2025
in Inspirational
0
शाळांना वाचविण्यासाठी सिद्धेश लोकरे निघाला स्कुटीवर

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
सिद्धेश लोकरे हा मुंबईमधील तरुण महाराष्ट्रातील दुर्बळ शाळांच्या शिक्षणाची स्थिती सुधारत त्यांना वाचविण्यासाठी स्कुटीवरून फिरत आहे. त्याच्या ‘मिशन ३०३०३’ या उपक्रमांतर्गत, तो ३० शाळांना मदत करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सरकारच्या मिशन २०३० पर्यत शाश्वत विकास साधायचा आहे. त्यात गुणवत्तापूर्ण सर्वसमावेशक शिक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. मात्र जेव्हा सिध्देशने महाराष्ट्रातील या ३० शाळांची परिस्थिती बघितली तेव्हा प्रथम त्याला हा मुद्दा साध्य होणार का? असा प्रश्न पडला. कारण या मुद्द्याच्या बरोबर उलटी परिस्थिती सिध्देशने या शाळांमध्ये अनुभवली.
या शाळांमध्ये कम्युटर, वीज आणि स्वच्छ टॉयलेट या मूलभूत सोयींचा अभाव होता. मुलांना शिक्षण देणार्‍या शाळांपैकी काही शाळांना तर फक्त बांबुचा आधार होता तर काही शाळा या देवळात भरविल्या जात होत्या. काही शाळांच्या भिंती पडलेल्या होत्या. लहान मुले शाळेत जाण्यासाठी चिखलात पायपीट करत तसेच प्रसंगी आपला जीवही धोक्यात घालून शाळेत येत आहेत हे देखील त्याने पाहिलं. शिक्षक त्यांच्या परीने शाळा, मुलांचे भवितव्य घडवत आहेत, मात्र अपुर्‍या सुविधांपुढे ते देखील हतबल झाल्याचे त्याने पाहिले. या कठीण परिस्थितीची विदारक अनुभव त्याने स्कुटीवरून हजारो किलोमीटर गावांमध्ये फिरत घेतला.
या दुर्गम भागातल्या शाळांची परिस्थिती त्याने सोशल मीडियावर त्याच्या ६ लाख व्ह्यूव असणार्‍या अकाउंटवर टाकली. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्याला निधी मिळू लागला.
या प्रवासाबद्दल सिद्धेश लोकरे म्हणतो की, ‘माझ्या वडिलांनी भाजी विकली, तर आई बीएमसी मध्ये क्लार्क म्हणून नोकरी करते. मला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. अनेक चढउतार मी आयुष्यात पाहिले. मग मी आयुष्यात तीस दिवसांचं चॅलेंज घेतलं. हे व्हिडीओ एवढे व्हायरल झाले की लोकं ट्रेनमध्ये देखील यावर बोलू लागले. तेव्हा ते पाहून माझ्या आईलाही कौतुक वाटलं. तीस दिवसानंतर मी घरी जाणार म्हटल्यावर आईने, वहिनीने माझं जोरदार स्वागत केलं. ‘राम जसे वनवासातून परतले होते तसं तुझं घरी स्वागत होईल ‘ असं मला अनेकांनी म्हटलं होतं. या सगळ्यांचं श्रेय मी माझ्या घरच्यांना, चाहत्यांना आणि माझ्या टीमला देईल. आता खरा अर्थाने माझा प्रवास सुरु झाला आहे.

Previous Post

चिमूकल्यांचे पर्यावरणपूरक‘ स्टार्ट अप’ चर्चेत

Next Post

फिरत्या चाकावर उपलब्ध होतोय ज्ञानाचा खजिना

Admin

Admin

Next Post
फिरत्या चाकावर उपलब्ध होतोय ज्ञानाचा खजिना

फिरत्या चाकावर उपलब्ध होतोय ज्ञानाचा खजिना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.