• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

इथे चहाच्या टपरीवर मिळते बाळांसाठी मोफत दूध

Admin by Admin
September 12, 2025
in Inspirational
0
इथे चहाच्या टपरीवर मिळते बाळांसाठी मोफत दूध

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे राजगीरहून
राजगीरमधील एका छोट्याशा चहाच्या टपरीवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरू आहे एक आगळीवेगळी परंपरा. येथे येणाऱ्या प्रत्येकाला चहा मिळतो, पण त्याचबरोबर लहान बाळांसाठी मात्र मोफत दूध दिलं जातं. होय, आजच्या काळात जेव्हा माणूस पाण्यासाठीही पैसे मोजतो, तेव्हा एका गरीब चहावाल्याने आपल्या टपरीतून हजारो मुलांना मोफत दूध पाजलं आहे.
१९९० साली श्रवणकुमार नावाच्या साध्या चहावाल्याने हा उपक्रम सुरू केला होता. त्याचं म्हणणं होतं की, ङ्खबाळ म्हणजे देवाचा अवतार. त्यांना पोषण मिळणं ही आपली जबाबदारी आहे.ङ्ग त्या दिवसापासून त्याने १८ महिन्यांपर्यंतच्या बाळांना रोज मोफत दूध द्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, कधी कोणाचं नाव न विचारता, कुठलाही दिखावा न करता ही सेवा तो करत राहिला.
दुर्दैवाने श्रवणकुमारचं निधन झाल्यानंतर बर्‍याच जणांना वाटलं ही परंपरा थांबेल. पण त्याचा भाऊ रणजितकुमार उर्फ ‘टुन्ना बाबा’ यांनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली. आजही रोज जवळपास तीन लिटर दूध गरजू बाळांना मोफत दिलं जातं. पैशांची तंगी असली तरी कधी ही सेवा बंद झाली नाही. कुटुंबाचा ठाम विश्वास आहे की, ही केवळ दानधर्म नाही तर मानवी मूल्यांची खरी ओळख आहे.
या छोट्या उपक्रमामुळे राजगीरमधील अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. गरीब पालकांना मुलांच्या दुधाची काळजी वाटत नाही, कारण त्यांना माहीत आहे की टपरीवर गेलं की त्यांचं मूल उपाशी राहणार नाही. अनेकांनी या कामात मदत करण्याचा प्रयत्न केला, पण टुन्ना बाबांनी नेहमी सांगितलं, ङ्खही आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे, आमची सेवा आहे.ङ्ग
एका गरीब चहावाल्याने नि:स्वार्थ सेवा देत मानवतेचा खरा अर्थ काय असतो हे जगाला शिकविले आहे. हा साधा माणूस आज हजारोंसाठी प्रेरणादायी ठरला आहे. माणसाने किती पैसे कमावले यापेक्षा त्याने समाजाला काय दिलं हेच खरं मोजमाप आहे, हे या गोष्टीतून दिसून येते.

Previous Post

अशांत मनाला शांत करणार ‘माईंड ऑफ’ यंत्र

Next Post

शेती साम्राज्य उभारणारे छत्तीसगडचे ‘हर्बल किंग’ डॉ. राजाराम त्रिपाठी

Admin

Admin

Next Post
शेती साम्राज्य उभारणारे छत्तीसगडचे ‘हर्बल किंग’ डॉ. राजाराम त्रिपाठी

शेती साम्राज्य उभारणारे छत्तीसगडचे 'हर्बल किंग' डॉ. राजाराम त्रिपाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.