• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

‘ती’ बनली ३०० बाळांची ‘दूधआई’!

Admin by Admin
August 9, 2025
in Inspirational
1
‘ती’ बनली ३०० बाळांची ‘दूधआई’!

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे तामिळनाडूहून
रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असं म्हटले जाते. विविध सामाजिक संस्थांकडून अनेकदा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. गरजूंसाठी अनेकजण रक्तदान करायला तयार असतात. मात्र तामिळनाडूतील सेल्वा बिंद्रा यांनी आणखी एक आदर्श घालून दिला आहे. सेल्वा बिंद्रा यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३०० लीटर दूध दान करुन नवजात बालकांना जीवनदान दिले आहे.
नवजात बाळासाठी आईचे दूध खूप महत्वाचे असते. अनेकांच्या नशिबात जन्मानंतर आईचे दूध नसते. आईच्या दुधाअभावी ते एकतर मरतात किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा मुलांसाठी ब्रेस्ट मिल्क बँक तयार करण्यात आल्या आहेत. परंतु बहुतेक माता त्यांचे दूध दान करण्यास कचरतात. पण सेल्वा बिंद्रा यांनी न कचरता दूध दान केले आहे.
सेल्वा बिंद्रा या तामिळनाडूतील कट्टूरच्या रहिवासी आहे. त्यांनी २२ महिन्यांत ३००.१७ लिटर आईचे दूध दान करून सामाजिक संदेश दिला असून ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. यामुळे त्यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळविले आहे.
सेल्वा बिंद्रा या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांनी एप्रिल २०२३ ते २०२५ या कालावधीत महात्मा गांधी मेमोरियल सरकारी हॉस्पिटलच्या मिल्क बँकेला हे दूध दान केले आहे.
याबाबत सेल्वा बिंद्रा म्हणतात की, आजही महिला स्तनपान देण्यास लाजतात. अफवा आणि अंधश्रद्धांमुळे अनेक मातांना असे करण्यापासून रोखले जाते. ‘सुरुवातीला माझे वजन कमी झाले.आणि अनेकांनी मला निराश केले. पण माझ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की दूध देण्याने कॅलरीज बर्न होतात. त्यानंतर मी या कामाशी भावनिकरित्या जोडले गेले.’ तुम्ही किती दूध देता हे महत्त्वाचे नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही दान करण्याचा निर्णय घ्या.
या सेल्वा बिंद्रा यांच्या दानामुळे अनेक नवजात बाळांचे प्राण वाचले आहेत. ज्या नवजात बालकांना आई नाही त्यांच्यासाठी हे स्तनपान अमृतासारखे आहे. तथापि, डॉक्टर तिच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहेत. त्यांच्या दुधामुळे अनेक नवजात बालकांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे.

Previous Post

मुंबई ते अहमदाबाद फक्त २ तासात

Next Post

इथे घडणार उद्याचे खगोलशास्त्रज्ञ

Admin

Admin

Next Post
इथे घडणार उद्याचे खगोलशास्त्रज्ञ

इथे घडणार उद्याचे खगोलशास्त्रज्ञ

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    7 months ago

    🙏🫡
    Salute

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.