• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

सातशे विद्यार्थ्यांकडून ‘एक पेड माँ के नाम’ ची संकल्पपूर्ती

Admin by Admin
August 7, 2025
in Inspirational
1

आनंदराव चव्हाण विद्यालयाचा उपक्रम
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे कराडहून
पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संस्थांबरोबरच शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. याबरोबरच गावोगावी शाळांमधूनही पर्यावरणाविषयी जागृती करण्यात येत आहे. कराडमधील मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्यावतीने सलग २६ वर्षांपासून बीजारोपण व वृक्षारोपण उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. नुकताच आनंदराव चव्हाण विद्यालयातील तब्बल सातशे विद्यार्थ्यांनी आगाशिव डोंगर परिसरात सातशे झाडे लावत ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रमाची उत्स्फूर्तपणे संकल्पपूर्ती केली.
यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक थोरात, वनअधिकारी ललिता पाटील प्राचार्या ए. एस. कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात,शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी वन अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ दिली.
मळाईदेवी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जांभूळ, आंबा, चिंच, सुबाभूळ, करंज, सीताफळ, तरवड आदी बियांचे संकलन करतात. तसेच रोपे आणि बी गोळा तथा सीड बॉल तयार करतात. त्यांना त्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोपांचे आगाशिव डोंगरात वृक्षारोपण करण्याची आता जणू परंपराच रूढ झाली आहे.
याबाबत अशोक थोरात म्हणाले, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनविषयक उपक्रम दिवसेंदिवस अधिकच बहरत चाललेला आहे. विद्यार्थी, शाळा, संस्था, वनविभाग यांच्या प्रेरणेतून हा पर्यावरणविषयक उपक्रमाचा सकारात्मक परिणाम समाजात पाहायला मिळतोय. त्यात विद्यार्थी, पालक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही थोरात यांनी या वेळी केले.
मळाईदेवी शिक्षण संस्था वृक्ष लागवड, त्यांचे संगोपन व संवर्धनासाठी सतत अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड आणि ओढ निर्माण करत आहे.
आगाशिव डोंगर परिसर ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
आगाशिव डोंगर परिसर हा स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरू लागला आहे. दररोज किंवा आठवड्याच्या अखेरीस शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आगाशिव डोंगरावर भ्रमंतीसाठी येणार्‍यांची संख्या वाढली आहे. आता या पर्यटकांचे समूह झाले असून, ते तिथे अनेक पर्यावरणपूरक कार्यक्रम घेत आहेत. वृक्षारोपणाचा संकल्प करीत आहेत. डोंगरावरील झाडांना सुरक्षा कुंपण घालणे. झाडांना आठवणी म्हणून नावे देणे, त्यांच्या सोबत छायाचित्रे काढणे, सेल्फी काढणे असाही उपक्रम तेथे करीत आहेत.

Previous Post

‘उदयगिरी’ ने भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले

Next Post

मुंबई ते अहमदाबाद फक्त २ तासात

Admin

Admin

Next Post
मुंबई ते अहमदाबाद फक्त २ तासात

मुंबई ते अहमदाबाद फक्त २ तासात

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    10 months ago

    🌱👍👍👍

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.