• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

दुष्काळी माणमधील विद्यार्थी होताहेत ग्लोबल

Admin by Admin
July 31, 2025
in Inspirational
0


स्काईपने संवाद साधत गिरवत आहेत अ‍ॅनिमेशनचे धडे
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे साताराहून :
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटत आहे, पण त्याबरोबरच या शाळाही आता डिजिटल होत आहेत. या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रयोग करत आहेत आणि त्याला यशही मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, विजयनगर ची मुले सध्या ‘कनेक्ट टू ग्लोबल वर्ल्ड’ची सफर करत आहेत. तामिळनाडूतील एका शिक्षकाबरोबर स्काइपने संवाद साधत ती अ‍ॅनिमेशनचे धडेही गिरवत असून, आता खर्‍या अर्थाने टेक्नोसॅव्ही होत आहेत.
ऐकण्यापेक्षा मुले बघून जास्त आकलन करतात हे मानसशास्त्रीय सत्य आहे. याच नियमानुसार आता ही मुले शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी बालाजी जाधव या ‘गुगल’ने सन्मानित केलेल्या क्रिएटिव्ह शिक्षकाची माण या दुष्काळीपट्ट्यामधील शाळेत बदली झाली. आदिवासी शाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या विजयनगर शाळेचे रूपडे पालटण्याचा चंगच या शिक्षकाने बांधला आहे. विजेची सुविधा नसताना स्वत:चा लॅपटॉप व टॅबचा वापर करत विद्यार्थ्यांना टेक्नोसॅव्ही बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सचा त्यांनी शिक्षणात वापर सुरू केला. मुलांचे कायमच आकर्षण असलेल्या अ‍ॅनिमेशनचा त्यांनी शिक्षणात वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मुलांचीही अभ्यासात गोडी वाढत आहे. अ‍ॅनिमेशनचा वापर करत पाठ्यपुस्तकातील धडे-कविता शिकवण्याचा प्रयोग त्यांनी सुरू केला आहे. यासाठी त्यांनी तामिळनाडूतील जॉन एम. राजा या शिक्षक मित्राची मदत घेतली. आता ‘स्काइप’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे विद्यार्थी सध्या अ‍ॅनिमेशनचे धडे गिरवत आहेत.
या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुले मराठीतून प्रश्न विचारतात. जाधव सर ते प्रश्न इंग्रजीत राजा यांना सांगतात. त्यांचे उत्तर राजा सांगतात. विविध सॉफ्टवेअरचा वापर करून सहज सोपे अ‍ॅनिमेशन तयार करण्याचे धडेही सध्या राजा त्यांना देत आहेत. डेमो पाहून विद्यार्थीही लगेच स्काइप कॅमेर्‍यासमोर शिक्षकाला प्रात्यक्षिक करून दाखवतात. या अभिनव प्रयोगानंतर शिक्षण अधिक सोपे झाले असून, या शाळेतील विद्यार्थी संख्याही वाढल्याचे जाधव सांगतात.
बालाजी जाधव यांचा आतंरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव
बालाजी जाधव या टेक्नोसॅव्ही शिक्षकाला आतापर्यंत ‘गुगल’सह इतरही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवले आहे. गेल्या वर्षी लंडनमध्ये झालेल्या जागतिक इंग्रजी परिषदेत सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली होती. ‘कनेक्ट टू ग्लोबल वर्ल्ड’च्या माध्यमातून या शिक्षकाने जगभरातील २५ देशांतील शाळांसोबत त्यांच्या विद्यार्थ्यांचा संवाद घडवला आहे. जगभरात होणारे शिक्षणातील विविध प्रयोग ते आपल्या शाळेतही राबवत आहे.
विदेशी शिक्षकही झाले प्रभावित
इतर देशांतील शिक्षकही जाधव यांचे उपक्रम समजण्याचे आणि शिकण्याचे प्रयत्न करतात. महाराष्ट्राची संस्कृती इतर देशांतील विद्यार्थ्यांना समजावी यासाठी या शाळेतील मुलींना लावणी व मुलांनी पोवाडा सादर करून इतर देशांतील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन कॅमेर्‍याद्वारे प्रात्यक्षिकही दाखवले आहे.
विद्यार्थ्यांना देश-विदेशातून शिक्षण
या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अमेरिकेतील शाळेकडून चित्रकलेच्या सहज व सोप्या पद्धती शिकल्या आहेत. त्यांनी दिल्ली आयआयटीचे डायरेक्टर व्ही. रामगोपाल राव यांच्यासोबत संवादही साधला आहे. ऑस्ट्रेलियातील मेरी नावाच्या शिक्षिकेने त्यांच्या देशातील शिक्षणातील खेळाचे महत्त्व, सराव पद्धती, स्पर्धा इत्यादींबाबत या मुलांना मार्गदर्शन केले आहे. चीनमधील सीन-चू नावाच्या शिक्षकाने या विद्यार्थ्यांना घड्याळ निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले आहे.

Previous Post

`तेल्या’ रोखण्यासाठी फळे क्वारांटाईन…

Next Post

अंगणवाडीतील चिमुकले आता होणार ‘स्मार्ट’

Admin

Admin

Next Post
अंगणवाडीतील चिमुकले आता होणार ‘स्मार्ट’

अंगणवाडीतील चिमुकले आता होणार 'स्मार्ट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.