मध्यरात्री भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’…! पाकिस्तानचे धाबे दणाणले..
पाकची नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्र मिसाईल स्ट्राईकने उद्ध्वस्त
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची देशातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे दिल्लीहून…
पहेलगाम हल्ल्याचा जबरदस्त बदला घेत भारतीय लष्कराने बुधवार (७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकिस्तानमधील विविध दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक करून ही ठिकाणे उद्ध्वस्त केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.
या ठिकाणांवर असलेल्या दहशतवाद्यांची माहिती आधीच गोळा करण्यात आली होती. या अचानक झालेल्या हल्ल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. या आॅपरेशनमध्ये एक हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचा अंदाज आहे. दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार भारताला आहे. त्यामुळे पाकिस्तानने कोणतीही आगळीक करून पुन्हा प्रत्युत्तर देण्याची चूक करू नये आणि शांत बसावे असा इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. भारताच्या मित्र राष्ट्रांनीही या दहशतवादविरोधी कारवाईचे समर्थन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि रशिया यासारख्या देशांतील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारताने उचललेल्या पावलांची माहिती दिली आहे.
Jai hind