* प्रवाशांसाठी ‘उडाण यात्रा कॅफे’चे
मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उडान कॅफे’ हे उपहारगृह आज सोमवारी (दि. 28) सुरू करण्यात येणार आहे. या कॅफेमधून विमान प्रवाशांना विमानतळावर स्वस्तात आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होणार आहेत.
‘उड़े देश का आम नागरिक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वात ‘उडान कॅफे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना 10 रुपयांत पाणी आणि चहा, 20 रुपयांत कॉफी, 20 रुपयांत समोसा आणि 20 रुपयांत मिठाई उपलब्ध होत आहे.
आजवर कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई या विमानतळांवर ही सेवा सुरू केली असून, या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता ही सेवा आजपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. या सेवेमुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.