• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

वीज कुठे पडणार हे अडीच तास अगोदर कळणार!

Admin by Admin
April 5, 2025
in Success Story
0
वीज कुठे पडणार हे अडीच तास अगोदर कळणार!

dramatic lightning thundertbolt bolt strike in daylight rural surrounding bad weather dark sky

* ISRO च्या या अनोख्या उपग्रहाची कमाल

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची बातमी आहे दिल्लीहून

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखीन एक चमत्कार केला आहे. जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. इस्रोने आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांचा अंदाज वर्तविण्यात महत्वाचे यश मिळविले आहे. आता इनसॅट -3 डी उपग्रहाकडून मिळणाऱ्या डाटा मार्फत सुमारे 2.5 तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापासून दूरवर सुरक्षित जागेवर जाता येणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या विभागातील ही एक क्रांती मानली जात आहे.

 

आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशनमध्ये ( OLR ) इस्रोच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र NRSC च्या संशोधकांनी इनसॅट – 3 डी उपग्रहाद्वारे मिळालेल्या ‘आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशन’OLR डाटामध्ये विशिष्ट संकेत पाहिले. OLR च्या तीव्रतेमध्ये त्यांना आढळले की ( OLR ) तीव्रतेत घट झाल्यामुळे वीज पडण्याची शक्यता असते. या निष्कर्षांवर आधारित, संशोधकांनी जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान (LST) आणि वाऱ्याचा वेग यासारखे अतिरिक्त मापदंड समाविष्ट केले. आणि एक संयुक्त मानक विकसित केले आहे. ते विजेच्या हालचालींमधील बदल प्रभावीपणे टिपते आणि अंदाज वर्तविते.

 

2.5 तासांआधी अंदाज वर्तवता येणार
या नव्या सिस्टममुळे वीज कोसळण्याचा अंदाज सुमारे 2.5 तास आधी कळणार आहे. यामुळे भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे. महाराष्ट्रात वीज कोसळण्याची शक्यता ही फार मोठी हानी असते. कारण देशात सर्वाधिक 27 टक्के मृत्यू वीज कोसळून भाजल्याने होतात. त्यामुळे जर वेळीच अलर्ट मिळाला तर शेतकरी आणि गावकऱ्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहचता येणार आहे.ज्यामुळे जीवीत आणि वित्तहानी टळणार आहे.

इस्रोच्या या संशोधनाने अंतराळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन नैसर्गिक संकटांचा अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा करता येणार आहे. या प्रणालीमुळे भारतातच नाही तर आकाशातून वीज कोसळण्याच्या क्षेत्रातील लोकांना याचा फायदा होणार आहे.अन्य देशातील आपत्ती व्यवस्थापनाही यंत्रणेत बदल करु शकणार आहेत.

Previous Post

स्वयंपाकी, कार ड्रायव्हरलाही मिळाला टाटांच्या संपत्तीत वाटा!

Next Post

आता राज्यभर सुरू होणार ‘बाइक टॅक्सी’

Admin

Admin

Next Post
आता राज्यभर सुरू होणार ‘बाइक टॅक्सी’

आता राज्यभर सुरू होणार 'बाइक टॅक्सी’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.