* जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प विचाराधीन
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
दुबई जगभरातील लोकांचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. दुबईला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या ही सर्वाधिक आहे. लवकरच दुबई ते मुंबई अशी ट्रेन सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन समुद्राखालुन धावणार आहे. जगातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प ठरणार आहे.
संयुक्त अमिराती दुबई आणि मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याचे प्लानिंग करत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पाण्याखालून जाणारा 2 हजार किलोमीटर लांबीचा जगातील पहिला रेल्वे मार्ग असणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचा हा विचारधीन रेल्वे प्रकल्प मध्यपूर्व आणि भारताला जोडणारा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प समजला जात आहे. अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे मुख्य सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल्शेही यांनी या प्रकल्पाची घोषणा केली.
दुबई ते मुंबई जोडणारी समुद्राखालची रेल्वे उभारणे कितपत शक्य आहे, याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
दुबई ते मुंबई रेल्वे ही प्रचंड वेगवान असेल. हा प्रवास विमानासारखाच सुपरफास्ट असेल. अंदाजे 2 हजार किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असू शकेल. या रेल्वेचा मार्ग हा पूर्णत: समुद्राखालून जाणारा आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या फूजैराह शहरातून सुरु होणारी ही रेल्वे रॉकेटच्या स्पीडने मुंबईत पोहोचेल. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही देशातला प्रवास आणि व्यापार वाढणार आहे. या रेल्वेचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो उभय देशात अरबांच्या तेलाची भारताला निर्यात आणि भारताच्या नर्मदेचे पाणी अरब देशांना आयात करण्यात. तेल आणि पाण्याची देवाण घेवाण हाच मुख्य उद्देश या रेल्वे प्रकल्पाचा असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.
हा प्रकल्प व्यवहारिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरु शकतो याची शाश्वती तपासूनच हा रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या अनुषंगाने कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाजू देखील तपासल्या जाणार आहेत. कारण, समुद्राखालून जाणारा हा रेल्वे प्रकल्प म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठा चमत्कार ठरणार आहे.