• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

ओसाड माळरानावर तिने फुलवली सुंदर बाग !

Admin by Admin
March 13, 2025
in Success Story
1
ओसाड माळरानावर तिने फुलवली सुंदर बाग !

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे बदलापूरहून

 

करियरच्या आशेने गावातून शहराकडे धाव घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण निसर्गाशी दुवा साधण्यासाठी शहरातून गावाकडे येऊन दर्शना दामले यांनी निसर्गाशी नाते जोडले आहे. आपल्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी त्यांनी ओसाड माळरानावर सुंदर फुलबाग फुलवली आहे.

ओसाड माळरानावर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती फुलावली. त्यांची मेहनत पाहून अनेकजण भारावले आहेत. बदलापूरच्या प्रगतशील शेतकरी दर्शना दामले यांनी अथक परिश्रमातून शाश्वत उत्पन्नाचा मार्गदेखील शोधला आहे. काही वर्षांपूर्वी ओसाड माळरान असलेल्या जागेत त्यांनी सेंद्रिय शेती करत आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागांसोबत भाजीपाल्याची लागवड केली आहे. शेतीला त्यांनी पशुसंवर्धनाचीही जोड दिली आहे.

बदलापूरजवळच्या जांभीळघरमध्ये ५ एकर जागेत त्यांनी दापोली कृषी विद्यापीठातून त्यांनी १०० आंब्याची झाडं आणून लावली. आज त्यांना प्रत्येक झाडापासून किमान ५०० ते ६०० फळांचे उत्पादन मिळते.
यासोबत नारळ, काजू, फणस, चिक्कू, केळी अशी फळबागही त्यांनी फुलवली. त्यांनी ३० गुंठ्यात भातशेती, तर २० गुंठ्यात भाजीपाला लावला आहे.

शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाचीही जोड देत आज १० गीर गायी आणि ५ ते ६ म्हशीही त्यांच्याकडे आहेत. शेतीत शेणखत, गोमूत्र, झाडांचा पालापाचोळा तसच गांडुळखताचाच वापर त्या करतात. त्यांच्या शेतातली सर्व उपकरणं ही सौरउर्जेवरच चालत असून यामुळे वीजेच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.

शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी याठिकाणी मसाल्याची पिके आणि औषधी वनस्पतींचीही लागवड केली आहे. शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न हवे असेल तर त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीची कास धरायला हवी असा त्यांचा आग्रह आहे.

एकीकडे नापिकी, वाढता उत्पादन खर्च यामुळे तरूण वर्ग शेतीपासून दूर जातोय. अशातच दर्शना दामलेंसारख्या गृहिणीने शेतीत केलेली ही प्रगती तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.

Previous Post

पाॅझिटिव्ह माॅर्निंग…!

Next Post

पाॅझिटिव्ह माॅर्निंग…. !

Admin

Admin

Next Post
पाॅझिटिव्ह माॅर्निंग…. !

पाॅझिटिव्ह माॅर्निंग.... !

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    1 year ago

    Great 👍🌱

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.