• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

लाटांवर स्वार होत विक्रम रचणारी धाडसी महिला – श्यामला गोली

Admin by Admin
January 27, 2025
in Success Story
1
लाटांवर स्वार होत विक्रम रचणारी धाडसी महिला – श्यामला गोली

स्वदेस न्युज (प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी तेलंगणाहून

श्यामला गोली यांनी अलीकडेच विशाखापट्टणम ते काकिनाडा हा दीडशे किमी अंतराचा समुद्र पट्टा पोहून पार करत एक नवीन विक्रम विस्थापित केला. रोज ३० किमी पोहत अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये त्यांनी आपली ही मोहिम पूर्ण केली. या प्रकारची मोहिम पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या आहेत.

तेलंगणातील एका सर्वसामान्य कुटुंबात श्यामला गोली वाढल्या. समाजशास्त्रात एम.ए.केल्यानंतर,पुढे ॲनिमेशनचा कोर्स करून स्वत:ची ॲनिमेशन कंपनी सुरू केली. नवऱ्याच्या साथीने अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले.
सारं काही सुरळीत सुरू असताना व्यवसायामध्ये नुकसान झाले. परिणामी त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी पोहायला सुरुवात केली. पोहता पोहता आपल्याला यात रुची आहे हे त्यांच्या लक्षात आले. पुढे २०१९ मध्ये त्यांनी पाटणा येथील खुल्या गंगा नदीच्या पात्राचे तेरा किमीचे अंतर पोहून पार केले. यानंतर त्यांचा हुरुप वाढला. पोहण्याच्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये त्या भाग घेऊ लागल्या. त्यामध्ये त्यांना यशही मिळाले.

पुढे २०२१ मध्ये श्रीलंका येथील पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या पावणे चौदा तासांत पोहून त्यांनी नवा विक्रम स्थापित केला. हा टप्पा पार करणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. तर तेराव्या जलतरणपटू आहेत. पाल्कच्या यशाने त्यांच्यात चांगलाच आत्मविश्वास निर्माण झाला. आता पुढे काय हा विचार करीत असतानाच, त्यांना विशाखापट्टणम् ते केकीनाडा हा समुद्रीय पट्टा खुणावू लागला. या प्रकारच्या समुद्रीय पट्ट्यात पोहणं हे खूप आव्हानात्मक असतं, पण त्यांनी मनाशी निर्धार करत मेहनत घ्यायला सुरुवात केली.
यासाठी आवश्यक तो सराव करीत त्यांनी २८ डिसेंबर २०२४ मध्ये आपल्या या मोहिमेला सुरुवात केली.
या मोहिमेत त्यांच्याबरोबर चौदा जणांची टीम कार्यरत होती. त्यात डॉक्टर्स, स्कुबा ड्रायव्हर अशी अनेक मंडळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात होती. समुद्रात पोहणं हे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं.

या मोहिमेतल्या अनुभवांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, वाटेत येणाऱ्या डॉल्फिनबरोबर पोहताना खूप धम्माल येत होती तर कधी जेलीफिश त्रास देत होते. त्याचबरोबर लाटांचा लहरीपणा, बदलते हवामान या साऱ्या गोष्टींमध्ये पोहण्यात अगदी कस लागला. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात आहे असं वाटत असताना, मला माझ्या योगा आणि ध्यानाचा खूप फायदा झाला. कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या ध्येयाकडे पोहचणार आहे, हा विश्वास मला मिळाला. खरोखरीच माझ्या या मोहिमा मला नुसतचं यश देत नाही, तर आयुष्याकडे अधिकाधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवितात.

आज मागे वळून जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे पाहते, तेव्हा जाणवते की, मी यशाचे जितके उंच शिखर बघितले आहेत तितकाच अपयशाचा तळही अनुभवला आहे. पण हे अपयश आले नसते तर मला माझ्यात दडलेले पोहण्याचे प्रेम कधी सापडलेच नसते.
खरोखरीच श्यामला गोलींचा जीवनप्रवास पाहिल्यानंतर एक गोष्ट सहजपणे जाणवते की, यशस्वी होण्यासाठी वयाचे बंधन नसते. हवी असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती.

आयुष्यात पन्नशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो की, आपण आता लवकरच म्हातारे होणार, ही भावना समस्त स्त्री-पुरुषांना त्रस्त करीत असते. त्यामुळे साहसी खेळ खेळणे किंवा खेळाशी निगडीत एखादी साहसी कृती करण्याचे स्वप्न फार कमी या वयात लोक बघतात, पण मनात जिद्द असेल तर त्यासाठी वय हे अडथळा ठरत नाही, हे ५२ वर्षीय श्यामला गोली यांच्याकडे पाहून निश्चित समजते.

Previous Post

भारतीय सैन्याच्या ताफ्यात आता ‘रोबोट डॉग्ज’

Next Post

कमाल!! 8 व्या वर्षी दहावी… 22 व्या वर्षी पीएच. डी.

Admin

Admin

Next Post
कमाल!! 8 व्या वर्षी दहावी… 22 व्या वर्षी पीएच. डी.

कमाल!! 8 व्या वर्षी दहावी... 22 व्या वर्षी पीएच. डी.

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    1 year ago

    Salute 🫡

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.