• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अंधत्वावर मात करत जिंकली 120 पदके

Admin by Admin
January 15, 2025
in Inspirational
1
अंधत्वावर मात करत जिंकली 120 पदके

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी अमरावतीहुन

आपल्या देशात अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा उंचावला आहे. कांचनमाला डी पांडे अशाच एक अंध आंतरराष्ट्रीय महिला जलतरणपटू आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने 120 पदकं जिंकली आहेत, त्यापैकी 115 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक आहे.
लहानपणापासूनच कांचनमाला यांनी विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मूळच्या अमरावतीच्या या  खेळाडू सध्या नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत कार्यरत आहेत. त्या राष्टीय पॅरा जलतरण स्पर्धेत अनेक पदकांच्या मानकरी आहेत.
कांचनमालांचे वडील ज्ञानेश्वर पांडे राष्ट्रीय हॉकीपटू होते. वडीलांप्रमाणे त्यांनासुद्धा खेळाडू व्हायचे होते.  १० वर्षांच्या असताना  त्यांनी वडिलांना जलतरण शिकण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी त्यांना  जलतरण तलावावर नेले.  अंध असल्यामुळे कोचने त्यांना  शिकवण्यास नकार दिला. मात्र, कांचनमाला निराश झाल्या नाहीत.  आठ दिवसांत स्वत:च्या बळावर त्या पोहोणे  शिकल्या. त्या रोज सराव करीत. यामुळे त्या परफेक्ट झाल्या. २००१ मध्ये विदर्भ जलतरण चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सामान्य खेळाडूंच्या गटात सहभागी होऊन सुवर्णपदक जिंकले. यानंतर अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवली. २००६ मध्ये मलेशियात पॅरा आशियाई गेम्समध्ये चीनच्या जलतरणपटूला हरवत त्यांनी सुवर्ण जिंकले. २००८ मध्ये जर्मनीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर २०१२ मध्ये डेन्मार्कमध्ये झालेल्या पॅरा जलतरण स्पर्धेत त्यांनी सुवर्ण आणि रौप्य मिळवले.


मुंबईच्या अरबी समुद्रात जलतरण करणाऱ्या त्या भारताची एकमेव पॅरा जलतरणपटू आहे. हे अंतर त्यांनी एक तास १४ मिनिटांत पूर्ण केले. यामुळे त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ इंडियन रेकॉर्ड्‍समध्ये सामील करण्यात आले आहे. त्यांना एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्या अपंग लोकांना आपल्या संघर्षाची कथा सांगून लढण्यासाठी प्रेरित करतात.
विश्व, आशियाड आणि राष्टकुल अशा विविध स्पर्धेत त्यांनी आठवेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अ‍ॅक्वा स्पोर्टस् क्लब येथे सराव करणाऱ्या कांचनमाला यांच्या खेळातील यशामागे पती विनोद देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.

Previous Post

जम्मूच्या दिव्यांग क्रिकेटरचा प्रेरणादायी संघर्ष…उद्योजकाने दिला मदतीचा हात

Next Post

भारत बनतोय स्टार्ट अप चे ग्लोबल सेंटर

Admin

Admin

Next Post
भारत बनतोय स्टार्ट अप चे ग्लोबल सेंटर

भारत बनतोय स्टार्ट अप चे ग्लोबल सेंटर

Comments 1

  1. डॉ. पूजा सामंत says:
    1 year ago

    खूपच प्रेरणादायक

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.