• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

कॉमनवेल्थमध्ये पुण्यातील राऊत बहीणभावाने पटकाविले सुवर्णपदक

Admin by Admin
December 17, 2024
in Positive news
0
कॉमनवेल्थमध्ये पुण्यातील राऊत बहीणभावाने पटकाविले सुवर्णपदक

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्यातील हडपसर येथील चिंतामणी व कादंबरी राऊत या बहीणभावाने सुवर्णपदक मिळवीत विजयाची मोहोर उमटवली आहे. या कामगिरीने क्रीडा क्षेत्रासह विविध व्यक्ती व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत जगभरातील एकूण ९७ देश सहभागी झाले होते.
कादंबरी बाळासाहेब राऊत हिने महिला सब ज्युनिअरच्या ६९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने स्कॉट प्रकारात १५० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. बेंच या प्रकारात तिने ७५ तर, डेड या प्रकारात १४० किलो वजन उचलून रौप्य पदकाला गवसणी घातली.
तिच्या एकूण कामगिरीसाठी एक सुवर्ण तर तीन रौप्य पदकांनी तिला सन्मानित करण्यात आले. कादंबरी सध्या रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी येथील के. के. घुले विधयलात बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. प्राचार्य संजय मोहिते व शिक्षक प्रा. दिगंबर मेमाने यांनी मार्गदर्शन केले.

कादंबरीचा जागतिक विक्रम

कॉमनवेल्थ स्पर्धेतील गतवेळची विजेती साऊथ आफ्रिकच्या चेअंते मलदेर हिच्या नावावर १४५ किलो वजन उचलण्याचा जागतिक विक्रम नोंदवला गेला होता. कादंबरीने या स्पर्धेत १५० किलो वजन उचलून मलदेरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यानिमित्ताने कादंबरीने या स्पर्धेतील जागतिक विक्रमावरही मोहोर उमटविली आहे.
विशेष मुलांच्या ९३ किलो वजनीगटात चिंतामणी बाळासाहेब राऊत यांने भारताचे नेतृत्व केले. त्याने स्कॉट या प्रकारात १५० किलो बेंच या प्रकारात ७० किलो तर डेड या प्रकारात १८० किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. त्याला प्रशिक्षक टी. बाकीराज, स्पेशल ऑलिम्पिकच्या चेअरमन मेधा सोमय्या, सचिव डॉ. भगवान तलवारे, संचालक जितेंद्र ढोले, अशोक नांगरे, वडील बाळासाहेब राऊत यांनी मार्गदर्शन केले.

Previous Post

१८ वर्षांच्या गुकेशने मिळवले बुद्धिबळातील जगज्जेतेपद

Next Post

फक्त 11 मिनिटांत ‘तानाजी’ने सर केला लिंगाणा

Admin

Admin

Next Post
फक्त 11 मिनिटांत ‘तानाजी’ने सर केला लिंगाणा

फक्त 11 मिनिटांत 'तानाजी'ने सर केला लिंगाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.