• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

मुंबईत विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये मिळतो वडापाव!

Admin by Admin
November 29, 2024
in Positive news
0
मुंबईत विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये मिळतो वडापाव!

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे मुंबईतून

दिवसभराच्या धावपळीत, लोकलच्या प्रवासात, ऑफिसच्या ब्रेकमध्ये कुठेही आपल्याला भूक लागली की डोळ्यासमोर उभा राहणारा पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मुंबई चा पदार्थ असलेला हा वडापाव आता जगभर लोकप्रिय आहे. महागाईनुसार हा वडापाव कुठं 15 तर कुठे 20 रुपयांना विकला जातो. पण, मुंबईत एक असे ठिकाण आहे जिथे शालेय विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये वडापाव दिला जातो.

कुठे मिळतो ‘हा’ वडापाव?

सायन सर्कलमध्ये 2009 पासून सतीश गुप्ता वडापावची विक्री करतात. त्यांच्या स्टॉलवर वडापाव आणि सामोसा हे दोनच पदार्थ मिळतात. सुरुवातीला त्यांचे शाळा-कॉलेजमध्ये कँटीन होते. त्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. 6 महिने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. त्यानंतर त्यांनी वडापावची विक्री सुरू केली. आता त्यांची मुलंही या व्यवसायात त्यांची मदत करतात. या स्टॉलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे शालेय विद्यार्थ्यांना 5 रुपये, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 10 रुपये तर अन्य सर्वांना 12 रुपयात वडापाव मिळतो.


कारण वाचून वाटेल अभिमान!

शाळेच्या गणवेशात मुले आली की त्यांना 5 रुपयांत वडापाव मिळतो. ‘या मुलांना थोडासाच पॉकेटमनी मिळतो त्यात ते इतर काहीही खाऊ शकत नाही त्यामुळे गणवेशात येणाऱ्या प्रत्येक मुलाला 5 रुपयांत वडापाव आम्ही देतो. इतक्या कमी किंमतीमध्ये वडापाव देणं परवडत तर नाही, पण मी आणि माझ्या मुलांनी गरिबी अनुभवली आहे. आम्ही मीठ, चपातीवर दिवस काढले आहेत. त्या काळात माझ्या मुलांना वडापाव खायचा असला तर 1 वडा आणि दोन पाव करून वड्याचा लहान तुकडा पावाला लावून द्यायचो. मुलांना वडापाव देण्यात मला आनंद वाटतो,’ असा भावुक अनुभव वडापाव चालवणाऱ्या सतीश गुप्ता काकांनी सांगितला आहे.
सतीश गुप्ता यांची ओळख आता ‘वडापाववाले काका’ अशी झाली आहे. शाळा सुटली की काकांच्या स्टॉलभोवती विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होतो. अनेक विद्यार्थी इथे वडापाव खाण्यासाठी गर्दी करतात. आम्ही रोज वडापाव खातो. कधीकधी तर डब्बा न आणता वडापाव खाऊनच घरी जातो. ‘हाच वडापाव मुंबईतला बेस्ट आहे’,असंही काही मुले म्हणतात.
प्रत्येक दिवशी ताजं तेल वापरून वडापाव, सामोसा तळला जातो. दुपारी 2 वाजता हे काका आपला ठेला लावतात.रात्री 10 वाजेपर्यंत येथे ग्राहकांची गर्दी असते. महागाईच्या या युगात आपल्यावर आलेली वेळ इतरांवर येऊ नये,असे त्यांना वाटते. म्हणूनच पदरमोड करुन हे काका शालेय विद्यार्थ्यांना 5 रुपयांमध्ये वडापाव देतात. त्यांच्या या चांगुलपणाची चव वड्यात उतरते. त्यामुळेचसुद्धा कदाचित  टेस्टी अख्ख्या मुंबईतील हा सगळ्यात चविष्ट वडापाव वाटत असावा, अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

वडापाव स्टॉलचा पत्ता

सायन सर्कल, भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ.

Previous Post

मृत समजलेल्या दुबईतील भारतीय तरुणाला मिळाले जीवदान! पुण्यात आणून उपचार सुरू, कुटुंबाला मिळाला दिलासा

Next Post

वंदे भारतची पहिली आदिवासी लोको पायलट रितिका तिर्की

Admin

Admin

Next Post
वंदे भारतची पहिली आदिवासी लोको पायलट रितिका तिर्की

वंदे भारतची पहिली आदिवासी लोको पायलट रितिका तिर्की

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.