• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पुण्याच्या टेकडीवर सापडला उडी मारणारा कोळी!, जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे संशोधन

Admin by Admin
November 9, 2024
in my news pune
1
पुण्याच्या टेकडीवर सापडला उडी मारणारा कोळी!, जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे संशोधन

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

 

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

 

पुणेकरांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या शहरात बाणेरच्या टेकडीवर एक नवा कोळी सापडलेला आहे. कोळ्याची ही नवी प्रजाती यामुळे समजली आहे. हा कोळी टेकडीवर सापडला असल्याने ‘ओकिनाविसियस टेकडी’ असे त्याला नाव देण्यात आले आहे.

बाणेर टेकडीवरील गरुडकर जैव विविधता उद्यानात हा कोळी आढळला. या कोळीचा शोध टेकडीवर लागल्यामुळे कोळीच्या नावात टेकडी हा शब्द टाकण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. या संशोधनाने पुण्याच्या जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे. विज्ञान आणि जैव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शोध हा एमआयटी-डब्ल्यूपीयुच्या संशोधकांनी लावला आहे. या शोधात एमआयटी-डब्ल्यूपीयू येथील पर्यावरणशास्त्रातील एमएस्सीचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी आणि केरळमधील ख्राईस्ट कॉलेजच्या ऋषिकेश त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यांना डॉ. पंकज कोपर्डे आणि डॉ. ए.व्ही. सुधिकुमार यांनी मार्गदर्शन केले. कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने बाणेर हिलवरील फायकस आणि प्लुमेरिया या झाडांवर कोळीचा अभ्यास केला. काही महिन्यांनंतर त्याला नवीन प्रजाती म्हणून मान्यता दिली.

ही प्रजाती ‘ओटाकरेंसिस’ प्रजातीच्या जवळ जाणारी आहे. मात्र, यामध्ये आकाराचा फरक आहे. हा कोळी जाड फांद्या आणि घनदाट पानांवरील झाडांवर, विशेषतः प्लुमेरिया म्हणजे चाफा, फायकस म्हणजे वड पिंपळ आणि महुआ अशा झाडांवर आढळला. उडी मारणारे कोळी त्यांच्या अनोख्या दृष्टी आणि चपळ हालचालींसाठी प्रसिद्ध आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले. ओकिनाविसियस टेकडी ही प्रजाती बाणेर हिल आणि पुण्यातील इतर जागांमध्ये आढळून येतो आहे.

हा नवा सापडलेला कोळी पर्यावरण रक्षण आणि जैवविविधचे संवर्धन या विषयी जागरूकता वाढवण्यासाठी चालना देऊ शकेल असा संशोधकांना विश्वास आहे. आमचा शोध हा पुण्याच्या समृद्ध नैसर्गिक वारशात एक छोटा परंतु महत्त्वाचा भर घालणारा आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

संशोधकांची टीम ही आता पुढील अभ्यासात गुंतली असून, ‘ओकिनाविसियस टेकडी’ आणि इतर स्थानिक प्रजातींची त्यांच्या परिसंस्थेत काय भूमिका आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी त्याच्या निष्कर्षांवर एक सविस्तर शोधनिबंध प्रकाशित करण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये या अनोख्या कोळीच्या पर्यावरणीय परिणामांवर प्रकाश टाकला जाईल, असे संशोधकांनी सांगितले.

Previous Post

दृष्टिहीन मतदारांसाठी ‘ब्रेल’मधून ‘स्लिप’

Next Post

देवदासींसोबत जो़डले बंधुत्वाचे नाते!

Admin

Admin

Next Post
देवदासींसोबत जो़डले बंधुत्वाचे नाते!

देवदासींसोबत जो़डले बंधुत्वाचे नाते!

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    2 years ago

    वाह खूप अभिमानास्पद

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.