स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे ठाण्यातून
महाराष्ट्राची ‘हिरकणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 10 वर्षीय ग्रिहिथा सचिन विचारे हिने रशियाच्या सीमेवर वसलेले अझरबैजान मधील सर्वात उंच पर्वत बाझार्डुझू शिखर यशस्वीरित्या सर केले आणि शिखरावर भारतीय ध्वज फडकवला.
हे शिखर सर करुन ग्रिहिथाने केवळ तिची अतुलनीय दृढनिश्चय आणि कौशल्य दाखवले नाही तर माउंट बाझार्डुझू हे आव्हानात्मक शिखर जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय बनण्याचा इतिहासही रचला आहे.
ठाण्याची रहिवासी महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 10 वर्षीय ग्रिहिथा विचारे हिने सकाळी 11.20 वाजता हे शिखर यशस्वीरित्या सर केले आणि शिखरावर भारतीय ध्वज फडकवला.
रशिया आणि अझरबैजान सीमा सुरक्षा दलांकडून मोहिमेची परवानगी मिळाल्यानंतर ग्रिहिथाने तिच्या वडिलांसह, अझरबैजान मधील Expedition टीम आणि भारताच्या Fly High Expeditions टीमसह चढाई सुरु केली आणि ही मोहीम यशस्वी केली.
सहाव्या वर्षांपासून करते पर्वतारोहण
ग्रिहिथा वयाच्या 6 व्या वर्षापासून पर्वतारोहण करत आहे. त्यात तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत आणि आत्तापर्यंत पर्वतारोहण क्षेत्रात 8 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि 1 एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावे आहेत. बाझार्डुझू हे ग्रिहिथाचं चौथे आंतरराष्ट्रीय यश असून ह्या आधी ग्रिहिथाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेपाळ मधील Mount Everest Base Camp वयाच्या 8 व्या वर्षी तर जगातला सर्वात उंच शिखर (Standalone) आफ्रिका मधील किलीमांजारो पर्वत आणि मलेशिया येथील माउंट किनाब्लू शिखर ही वयाच्या 9 व्या वर्षी सर केले आहेत. ही शिखरे सर करणारी ग्रिहिथा ही सर्वात कमी वयाची भारतीय ठरली आहे.
देशासाठी अभिमानास्पद सह्याद्रीतील वजीर सुळका, नवरा नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका असे अनेक कठीण ट्रेक सुद्धा ग्रिहिथाने अतिशय कमी वयात सर केले आहेत. ग्रिहिथाचे बाझार्डुझूचे यश हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि सर्वत्र तरुण साहसींसाठी प्रेरणादायी आहे.
Wah mast story