• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

स्वयंपूर्ण भारत… आयात करावी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतातच बनणार!

Admin by Admin
September 16, 2024
in Positive news
0
स्वयंपूर्ण भारत… आयात करावी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतातच बनणार!

Laboratory technician holds a powerful processor in his hands. CPU computer processor shallow focus. CPU socket of the computer's motherboard. Concept of computer, motherboard, hardware and technology

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे दिल्लीतून

 

स्वातंत्र्यानंतर आजवर नेहमी आयात करावी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता संपूर्णपणे भारतात तयार होणार आहे. स्वयंपूर्ण देशाच्या वाटचालीसाठीचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे. इलेक्ट्राॅनिक उत्पादनांच्या बाजारपेठेतील देशाचे अवलंबित्व यामुळे कमी होणार असून भविष्यात भारत जगाला सेमीकंडक्टर पुरवणारा देश बनू शकणार आहे. मेक इन इंडियाच्या प्रयत्नांतील ही एक महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.

देशात बनलेली पहिली सेमीकंडक्टर चिप 2025 च्या मध्यापर्यंत येणार आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्रशासनाने  कायन्स टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडच्या रोज 60 लाख चिप बनवण्याच्या पॅकेजिंग प्लँटला मंजुरी दिली आहे. या प्लँटसाठी 3300 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. गुजरातमधील साणंद येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत दोन अन्य चिपमेकींग प्लॅन्ट येत आहेत. कायन्सचा प्लॅन्ट 46 एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे.

हा प्रकल्प 46 एकरात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात उत्पादन होणाऱ्या सेमीकंडक्टरचा मोठा वाटा कायन्स टेक्नोलॉजीलाच जाणार आहे. त्याची बुकींग यापूर्वीच झाली आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर चीपचा वापर विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यात इंडस्ट्रियल, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहन, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकॉम, मोबाइल फोन यांचा समावेश आहे.
सेमीकंडक्टर प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. या ठिकाणी उभारला जाणारा विशेष क्षेत्रात एकूण दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. त्या सर्व प्रकल्पातून रोज सात कोटी सेमीकंडक्टर चिप तयार होतील.

सेमीकंडक्टर का महत्त्वाचे?

सेमीकंडक्टरला सिलिकॉन चिप असेही म्हणतात. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनात त्याचा वापर केला जातो. या चिपचा वापर केल्याशिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवता येत नाही. एलईडी बल्बपासून ते क्षेपणास्त्रपर्यंत आणि कारपासून ते मोबाइलपर्यंत, संगणकापासून लॅपटॉपपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. ही चिप इलेक्ट्रॉनिक वस्तुची मेमरी ऑपरेट करण्यासाठी कार्य करते. सेमीकंडक्टरचा वापर स्मार्ट घड्याळे, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, ड्रोन, एव्हिएशन सेक्टर आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही केला जातो.

 

Previous Post

परदेशातील पुणेकरांसाठी धावून येणार ‘विघ्नहर्ता’

Next Post

‘स्वच्छ’ प्रयत्नांनी शहर राखले चकाचक!… निर्माल्य संकलनासाठी कचरावेचकांचे प्रयत्न

Admin

Admin

Next Post
‘स्वच्छ’ प्रयत्नांनी शहर राखले चकाचक!… निर्माल्य संकलनासाठी कचरावेचकांचे प्रयत्न

'स्वच्छ' प्रयत्नांनी शहर राखले चकाचक!... निर्माल्य संकलनासाठी कचरावेचकांचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.